Luxury Smartphone: 3 लाखाहून अधिक किंमतीचा चायनीज लग्झरी स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या टॉप व्हेरियंटची किंमत अन् फीचर्स
Luxury Smartphone: आतापर्यंत तुम्ही आयफोनच्या किंमती ऐकल्या असतील. मात्र, सध्या असा एक स्मार्टफोन लाँच झाला आहे. ज्याची किंमत आयफोनपेक्षाही जास्त आहे. 8848 M6 Private Customised Dragon Limited Edition असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 3 लाख 24 हजार 500 रुपये इतकी आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 5 लाखाहून अधिक रुपये मोजावे लागतील. हा स्मार्टफोन चायनीज ब्रँडचा आहे. ग्राहकांना हा फोन तीन टॉप मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

यात पहिला स्मार्टफोन Vermilion Cowhide or Azurite Leather नावाने आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजची सोय आहे. या मोबाईलच्या डिझाईनसाठी गोल्ड प्लेटेड टायटेनियम अलॉयचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय फोनला खास लूक देण्यासाठी नॅचरल डायमंड आणि येलो सफायर सिंथेटिक रूबीचा टच देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या फोनची किंमत 3 लाख 24 हजार 500 रुपये इतकी आहे. (हेही वाचा -Realme Narzo 10A चा आज दुपारी 2 वाजता Flipkart वर होणार फ्लॅशसेल, खरेदी करण्यापूर्वी माहित करुन घ्या 'या' गोष्टी)
या स्मार्टफोनच्या दुसऱ्या व्हेरियंटची किंमत जवळपास 4 लाख रुपयांपर्यंत आहे. Blue Dragon Lizard Skin असं या व्हेरियंटचं नाव आहे. या मोबाईलच्या डिझाईनमध्ये गोल्ड प्लेटेड टायटेनियम अलॉयडचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5274 अमेरिकी डॉलर्स म्हणजेचं भारतीय रुपयांमध्ये 3 लाख 89 हजार रुपये आहे.
याशिवाय या स्मार्टफोनमधील सर्वात महागड्या व्हेरियंटचं नाव Basalt Crocodile Leather आहे. या स्मार्टफोनची किंमत 6600 डॉलर म्हणजेचं 4 लाख 86 हजार 600 रुपये आहे. म्हणजेच या फोनमधील टॉप व्हेरियंटकरिता तुम्हाला जवळपास 5 लाख रुपये लागणार आहेत. या लग्झरी स्मार्टफोनमध्ये 865 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय यात 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून 16 मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,380mAh बॅटरी देण्यात आली असून स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.01 इंच आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)