दररोज फेसबुकवरील 8 हजार लोकांचा होत आहे मृत्यू; जाणून घ्या त्यानंतर अकाऊंटचे काय होते
त्यामुळे एका वळणावर फेसबुकवर जितके जिवंत युजर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू झालेल्या लोकांची संख्या असणार आहे.
जगामधील सर्वात मोठे सोशल मिडिया व्यासपीठ म्हणून फेसबुक (Facebook) कडे पहिले जाते. जीवनातील छोट्यात छोटी गोष्टही आजकाल फेसबुकवर शेअर केली जाते. सध्या फेसबुक पाहूनच एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांच्या जीवनातील घटना जाणून घेतल्या जातात. मात्र कधी विचार केला आहे, आपल्या मृत्युनंतर आपल्या फेसबुक अकाऊंटचे काय होत असेल? या जगातील आपले अस्तित्व जरी संपले असले तरी, डिजिटल व्यासपीठावरील आपले अस्तित्व तसेच राहिले जाते. सध्या 'फेसबुक'वर दररोज 8000 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होत आहे. त्यामुळे एका वळणावर फेसबुकवर जितके जिवंत युजर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू झालेल्या लोकांची संख्या असणार आहे. थोड्याच दिवसात फेसबुक ही डिजिटल स्मशानभूमी बनणार आहे.
सध्या 'फेसबुक' वर जवळपास दोन अब्ज युझर्स आहेत. तर व्हॉटसअपकडे 1.5 अब्ज, इन्स्टाग्रामवर 1 अब्ज आणि ट्विटरकडे 33.6 करोड युझर्स आहेत. 2012 सालापर्यंत, मृत्यू झालेल्या फेसबुक खातेदारांची संख्या 30 दशलक्ष झाली आहे. मात्र अशा लोकांची फेसबुक खाती ही डिजिटल व्यासपिठावर तशीच आहेत. मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीचे वाटप केले जाते, मात्र अशा या सोशल मिडियावर असणाऱ्या संपत्तीचे काय? तर आता ही संपती, म्हणजेच पोस्ट्स, फोटोज, व्हिडिओज त्या व्यक्तीच्या वारसांना मिळू शकणार आहे. त्यासाठी वारस रितसर परवानगी घेऊ शकतात. (हेही वाचा: आता फेसबुकवरून व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवणे होणार शक्य; तीनही Apps चे होत आहे विलीनीकरण)
यासाठी फेसबुक आता अशा वारसांना निवडण्याचे स्वातंत्र्य देणार आहे. म्हणजे तुमचे कुटुंबीय किंवा तुमचे मित्र तुमच्या खात्याचे वारसदार होऊ शकतात. मृत्युनंतर असे वारसदार तुमच्या नावाने खाते चालवू शकणार नाहीत अथवा तुमचे मेसेजेसही त्यांना दिसणार नाहीत. यासोबत तुम्ही मृत्यूनंतर आपले अकाऊंट डिलीट करण्याचे आदेशही फेसबुकला देऊ शकता.