PM Modi on Vinesh Phogat Disqualification: 'तू भारताचा अभिमान, प्रत्येकासाठी प्रेरणा'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्ट
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी काही ग्रॅम वजनामुळए अपात्र करण्यात आली. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट द्वारे भावना व्यक्त केल्यात.
PM Modi on Vinesh Phogat Disqualification: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Disqualified) पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये महिला कुस्तीच्या (Women's Wrestling) 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट द्वारे भावना व्यक्त केल्यात. विनेश, तू चॅम्पियन्समध्ये चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजची घटना दुखावणारी होती. मात्र, मला माहित आहे की तू लवचिकतेचे प्रतीक आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तूझा स्वभावच राहिला आहे. मजबूत रित्या परत या. आम्ही सर्व तुमच्यासाठी आहोत. असे नरेंद्र मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय मानक आणि ऑलिम्पिक नियमांनुसार (Olympic Disqualification) या गटात खेळण्यासाठी तिचे वजन 50 किलोंपेक्षा फक्त 100 ग्रॅम जास्त होते. वजन जास्त झाल्याने तिच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. (Vinesh Phogat Hospitalised: विनेश फोगट डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल)
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट
अपात्रतेचे तपशील
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अपात्रतेची पुष्टी केली. तसेच, घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. याच वेळी असोसिएशनने विनेश फोगटसाठी हा काळ कठीण असला तरीही तिने गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगटच्या अपात्रतेचा अर्थ असा की, ती रौप्यपदकासह कोणत्याही पदकासाठी पात्र राहणार नाही. आता 50 किलो गटात फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेतेच राहतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)