भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो
भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट (Geeta Phogat) यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कुस्तीपटू गीता फोगाटने पवन कुमार याच्याशी 2016 मध्ये लग्न केले होते. आज 24 डिसेंबर 2019 रोजी गीता फोगाटने एका मुलाला जन्म दिला आहे. गीताने तिच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.
गीता फोगाट आई झाली असून आपले पती पवन कुमारसह आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. गीता फोगाटने फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहले आहे की, "हॅलो बॉय!! या जगात तुझे स्वागत आहे. तो आला आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. तु्म्हीही प्रेम आणि आशिर्वाद द्या. घरी आलेल्या नव्या पाहुण्याने आमचे जीवन परफेक्ट केले आहे. हा आनंदाचा क्षण न सांगता येणार आहे", असे गीता फोगाट म्हणाली आहे. हे देखील वाचा- Video: झए रिचर्डसन याचा अचूक थ्रो, बिग बॅश लीग सामन्यातील 'हा' रन-आऊट पाहून प्रेक्षक झाले आश्चर्यचकित
गीता फोगाटचे ट्वीट-
भारताची यशस्वी कुस्तीपटू गीता फोगाटने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिला होता. याशिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने 2 गोल्ड मेडल जिंकले आहेत. गीता ही काही दिवसांपासून खेळापासून दूर आहे. गीता फोगाट हिच्या जीवनावर अधारित सिनेमा देखील आला होता. त्यात बॉलिवूड कलाकार अमिर खान आणि फातिमा सना शेख यांची मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दर्शवली होती.