Yuzvendra Chahal Video: युझवेंद्र चहल दारूच्या नशेत होता ? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चहल त्याच्या कारकडे जाताना दिसत आहे.
भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आयपीएल (IPL) 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळत आहे. चहल हा आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याचबरोबर हा स्टार स्पिनर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे.
चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चहल मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चहल त्याच्या कारकडे जाताना दिसत आहे. पण असे दिसून येते की त्याला चालण्यात खूप त्रास होत आहे, म्हणजेच त्याला नीट चालता येत नाही आणि एक व्यक्ती त्याला गाडीपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहे. हेही वाचा MI vs RR: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स रंगणार सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना ?
त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीने चहलला कारमध्ये बसवले. मात्र, चहल कारमध्ये बसल्यानंतरही खूपच अस्वस्थ दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. चहल ज्या कारमध्ये बसला होता त्या गाडीवर मुंबई इंडियन्सचा लोगो होता. व्हायरल व्हिडिओवरून असा दावा केला जात आहे की चहल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता आणि हा व्हिडिओ तिथला आहे.
मात्र, हा व्हिडीओ रोहित शर्माच्या बर्थडे पार्टीचा आहे याची कोणत्याही प्रकारे पुष्टी झालेली नाही. त्याच वेळी, चहल अस्वस्थ का दिसत होता याची कोणत्याही प्रकारे पुष्टी झालेली नाही. तो मद्यधुंद होता किंवा त्याला आणखी काही समस्या होती, आम्ही अशा कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ पाहून लोकांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना आज मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. राजस्थान आता 8 पैकी 5 सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.