Kargil Vijay Diwas: विराट कोहली, शिखर धवन आणि अन्य खेळाडूंनी कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद सैनिकांना वाहिली श्रद्धांजली

यंदाचे हे 20 वे वर्ष आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यासारख्या अन्य खेळाडूंनी ट्विटरवर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले.

(Photo Credit: @SDhawan25/Twitter)

आज संपूर्ण देश कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यंदाचे हे 20 वे वर्ष आहे. या दिनानिमित्त देशांत वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कारगिल (Kargil) जिल्ह्यामध्ये जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाचे फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील नागरिक याठिकाणी येऊन विजयस्तंभाला आदरांजली वाहत आहेत. कारगिल विजयानिमित्त देशभरातून अनेक दिग्गजांनी भारतीय लष्कराला आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात आपले खेळाडू देखील मागे नाही. (Kargil Vijay Diwas 2019: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यासारख्या अन्य खेळाडूंनी ट्विटरवर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला की भारतीय सेनेच्या शहीद जवानांनी केलेले बलिदान तो विसरणार नाही. दुसरीकडे, विजेंदर सिंह म्हणाला की,"सगळ्यांनी थोडेसे काही दिले तर थोड्यांनी सर्व काही दिले. पडले पण कधीच विसरले नाही."

आमच्या साठी आपण केलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही

कारगिलच्या शहीद सैनिकांना माझा मी नमन करतो

तुम्ही तिथेच उभे आहात म्हणून आम्ही इथे पुढे चाललो आहोत

मी शाहिद जवानांच्या पुढे झुकत नमन करतो

आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही

काश्मीरवर वर्चस्व मिळवण्यासाठी मे 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केला. जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यासह आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने हल्ले चढवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या युद्धामध्ये भारतीय लष्कराने अतुलनीय शौर्य देखवत तब्बल 12 फुट उंचावरील द्रास, तोलोलिंग, काकसार आणि टायगर हिल या ठिकाणांहून पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावले होते. आणि शेवटी दोन्ही सैन्याचे अनेक जावांनी आपले प्राण गमावल्यावर 26 जुलै 1999 मध्ये पाकिस्तानने आपला पराभव मान्य करत युद्धातून माघार घेतली.