PBKS vs LSG: आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स येणार आमनेसामने, जाणून घ्या कोणाचा पगडा जड ?

आयपीएलमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जचे संघ केवळ दोन वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला आहे.

आयपीएल (IPL) 2023 मध्ये आज पंजाब किंग्जसमोर (PBKS) लखनौ सुपर जायंट्सचे (LSG) आव्हान असेल. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना खेळला जाईल.

या हंगामात दोन्ही संघांची ही दुसरी भेट आहे. तत्पूर्वी पंजाब किंग्जने लखनौचा त्यांच्या घरच्या मैदानावर 2 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या दोघांमध्ये आयपीएलमध्ये किती सामने खेळले गेले आणि कोणत्या संघाने किती विजय मिळवले, हे जाणून घेऊया. आयपीएलमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जचे संघ केवळ दोन वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला आहे. हेही वाचा Arjun Tendulkar Video: अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील 'तो' व्हायरल व्हिडिओ फेक, नवी क्लिप आली समोर

आयपीएलमध्‍ये दोघांमध्‍ये पहिला सामना 2022 च्‍या सीझनमध्‍ये खेळला गेला होता, ज्यामध्‍ये लखनौ सुपर जायंट्‍सने 20 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या मोसमात खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने 2 गडी राखून विजय मिळवला. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनौला लक्ष्याचा पाठलाग करताना पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघ खूप मजबूत आहेत. लखनौ 4 विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्ज 4 विजयांसह सहाव्या क्रमांकावर आहे. दोघांमधला शेवटचा सामना अगदी जवळचा होता. अशा स्थितीत कोणत्याही एका संघाला विजयाचा दावेदार म्हणणे कठीण होऊ शकते. विशेष म्हणजे, लखनौने आपला शेवटचा सामना गुजरातविरुद्ध गमावला, तर पंजाबने शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय नोंदवला. पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला.

संभाव्य संघ

पीबीकेएस प्लेइंग इलेव्हन - अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (क), जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत सिंग भाटिया, भानुका राजपक्षे, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर.

एलएसजी प्लेइंग इलेव्हन - क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, जयदेव उनाडकट, मार्क वुड, रवी बिश्नोई, आवेश खान.