LSG vs SRH Weather Report: आज लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, जाणून घ्या हवामानाचा अंदाज
अशा स्थितीत या सामन्यात दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे.
आयपीएलच्या 10व्या (IPL 2023) सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. एकीकडे लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) पराभव स्वीकारावा लागला होता, तर हैदराबादला पहिल्या सामन्यात राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत या सामन्यात दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे.
दुसरीकडे, या रोमांचक सामन्यापूर्वी आज आम्ही तुम्हाला लखनऊची खेळपट्टी आणि हवामान कसे असेल ते सांगणार आहोत. AccuWeather नुसार लखनऊमध्ये आज पावसाची शक्यता नाही. येथे सकाळी सूर्यप्रकाश असेल. त्याच वेळी, संध्याकाळी देखील हवामान स्वच्छ असेल. लखनौमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हेही वाचा Prithvi Shaw Selfie Controversy: सपना गिलच्या तक्रारीनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉवर गुन्हा दाखल
अशा परिस्थितीत चाहत्यांना कोणत्याही तणावाशिवाय रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना खूप आवडेल. हायस्कोरिंग सामने येथे पाहता येतील. मात्र, येथील शेवटच्या आयपीएल सामन्यावर नजर टाकली तर त्यात फिरकीपटूंना थोडीफार मदत मिळाली. त्याचवेळी या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका बजावेल, अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.
लखनौ सुपर जायंट्स संभाव्य 11: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस/काईल मेयर्स, निकोलस पूरन, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, मार्क वुड, जयदेव उनाडकट/यश ठाकूर, आवेश खान.
इम्पॅक्ट प्लेयर - के गौतम
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य 11: अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, मार्को जॅन्सन/आदिल रशीद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेयर - अब्दुल समद