T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तिकीट बुकिंग सुरू, 'अशी' खरेदी करता येतील

ही तिकिटे 't20 worldcup.com' वर उपलब्ध आहेत. यामध्ये फायनलसह 45 सामन्यांची तिकिटे (Match tickets) खरेदी करता येणार आहेत.

भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

ऑस्ट्रेलियात (Australia) 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचषक (World Cup) स्पर्धेच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. ही तिकिटे 't20 worldcup.com' वर उपलब्ध आहेत. यामध्ये फायनलसह 45 सामन्यांची तिकिटे (Match tickets) खरेदी करता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी आणि सुपर 12 टप्प्यासाठी मुलांसाठी तिकीट $5 आहे, तर प्रौढांसाठी तिकीट $20 आहे, आयसीसीने (ICC) एका निवेदनात म्हटले आहे. प्रथमच, पुरुषांचा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात आहे, ज्याचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होतील.

ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अॅरॉन फिंच म्हणाला, आयसीसी टी20 विश्वचषक शानदार असेल. आमच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपद राखण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तो म्हणाला, घरच्या प्रेक्षकांचे महत्त्व 2015 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात आणि गेल्या वर्षीच्या महिला T20 विश्वचषकात दिसून आले. जेव्हा संपूर्ण देश आम्हाला प्रोत्साहन देत असेल तेव्हा आम्ही आणखी एक संस्मरणीय विश्वचषक बनवू. हेही वाचा IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजयालाही परिपूर्ण मानत नाही रोहित शर्मा, सामन्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर टीम इंडिया 30 ऑक्टोबरला पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत सामना खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात २ नोव्हेंबरला सामना होणार आहे.


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif