Mohammad Siraj New Record: टीम इंडियाचा वेगवान गोलंदांज मोहम्मद सिराजने केला अनोखा विक्रम, जगातील एकही गोलंदाज जवळपास नाही
पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कर्णधाराची निराशा होऊ दिली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) पॉवरप्लेमध्येच पहिली विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर आणले.
IND vs SL 2nd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. गुवाहाटीतील या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आणखी एका विजयासह रोहित शर्माच्या संघाला मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावल्याने त्याला प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कर्णधाराची निराशा होऊ दिली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) पॉवरप्लेमध्येच पहिली विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर आणले. दरम्यान, टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नवीन शिखर गाठले आहे. मोहम्मद सिराजच्या विक्रमाजवळ जगातील एकही गोलंदाज नाही.
वन डे पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स
श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. सलामीवीर अविष्का फर्नांडोला पॅव्हेलियनमध्ये पाठवून मोहम्मद सिराजने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. हा भारताच्या डावातील सहाव्या षटकाचा शेवटचा चेंडू होता. 2022 पासून आतापर्यंत मोहम्मद सिराजने वन डे पॉवरप्लेमध्ये 19 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या पॉवरप्लेमध्ये दहा विकेट्स आहेत. मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाच्या किती पुढे गेला आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. (हे देखील वाचा: AFG vs AUS: ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसोबत वनडे मालिका खेळण्यास दिला नकार, जाणून घ्या का घेतला हा निर्णय)
मोहम्मद सिराजने घेतल्या 3 विकेट
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 39.4 षटकात केवळ 215 धावांवर गारद झाला होता. श्रीलंकेसाठी सलामीवीर नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 216 धावा करायच्या आहेत.