Rohit Sharma's Epic Reply To Inzamam: 'कधी-कधी डोके वापरणेही गरजेचे'; इंझमाम उल हकच्या बॉल-टेम्परिंग आरोपांवर रोहित शर्माचे बेधडक उत्तर
त्याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या कर्णधाराने इंझमाम उल हकच्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवर बेधडक प्रत्युत्तर दिले आहे.
Rohit Sharma's Epic Reply To Inzamam: दक्षिण आफ्रिका आणि अफगानिस्तान यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता भारताचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना होईल. मात्र त्या आधी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्याने त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर 8 फेरीच्या सामन्यानंतर, पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने टीम इंडियाच्या गोलंदाजांवर बॉल टेम्परिंगचे गंभीर आरोप केले होते, पत्रकार परिषदेत त्याबाबत प्रश्न विचारला असता कर्णधार रोहित शर्माने प्रत्युत्तर देत सर्वांनाच आर्श्चचकीत केलं.
रोहित शर्मा म्हणाला की, 'यावर मी तुम्हाला काय उत्तर देऊ? जर तुम्ही दिवसभरात इथल्या परिस्थितीत सामना खेळलात तर खेळपट्टी खूप कोरडी होते. त्यामुळे बॉल आपोआप रिव्हर्स स्विंग होतो. रिव्हर्स स्विंग फक्त आमचाच्यात बॉलचा नाही तर सर्व संघांचा झाला. कधी कधी डोके वापरणेही गरजेचे असते. वर्ल्डकपचे कुठे खेळवले जात आहेत हेही बघावं लागेल. सामने ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जात नाहीयत. मला इतकंच बोलायचं आहे.'
इंझमाम उल हकने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर खोटे आरोप केले होते, जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर8 फेरीच्या सामन्यात 15 व्या षटकात त्याचे बॉल रिव्हर्स स्विंग होत होते, ते पाहता इंझमामने हे वक्तव्य केले होते. टीम इंडियाने हा सामना 24 धावांनी जिंकला होता आणि जो सेंट लुसियाच्या मैदानावर खेळला गेला होता.