IPL Auction 2025 Live

Coronavirus: स्थलांतरित मजुरांच्या मदतीस आलेल्या सोनू सूद याला 'गब्बर' शिखर धवन ने केला सलाम, केले खास Tweet

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या कामगारांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. स्थलांतरी मजुरांसाठी सोनू करत असलेल्या मदतीची प्रत्येकजण स्तुती करत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननेही सोनूचे कौतुक केले.

सोनू सूद, शिखर धवन (Photo Credit: Twitter/Getty)

कोरोना व्हायरस लॉकडाउनचा (Lockdown) सर्वात जास्त परिणाम भारतातील प्रवासी कामगारांवर (Migrant Workers) झाला आहे. हे मजदूर आपली गावं सोडून इतर शहरात कामासाठी आलेले होते. लॉकडाउनमुळे मिळेल ते साधन वापरून घरी परतण्यास हे कामगार असहाय्य आहेत. काही जणांना सरकारने आयोजित केलेल्या रेल्वे सेवांचा लाभ मिळाला, तर काही अजूनही पायपीट करून घरी जायला निघाले आहेत. लॉकडाउन करण्यात आल्यामुळे या कामगारांकडे काम आणि अन्न दोन्ही उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत या कामगारांना घरी जायचे आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) या कामगारांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. स्थलांतरी मजुरांसाठी सोनू करत असलेल्या मदतीची प्रत्येकजण स्तुती करत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननेही (Shikhar Dhawan) प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी सोनूचे कौतुक केले. बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारी सोनू वास्तविक जीवनाचा खरा नायक आहे हे त्याने त्याच्या कृतीमधून सिद्ध केले आहे. (अभिनेता सोनु सुद ने परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या घरी पाठवण्याच्या विनंंतीला दिलेली 'ही' उत्तरे पाहुन तुम्हीही व्हाल त्याचे फॅन,पहा ट्विटस)

या कठीण परिस्थितीत, सोनू दिवस-रात्र स्थलांतरितांची मदत करत आहे. सोनूची ही मदत पाहून शिखरने ट्विट करून त्याचे अभिवादन केले आणि म्हटले, "तुमच्या महान प्रयत्नांसाठी सोनू सूद यांना मोठा सलाम. आपण स्थलांतरित मजूर त्यांच्या घरी पोचले आहेत हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहात."

दरम्यान, अलीकडेच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सोनूने सांगितले की, "माझ्या लोकांना गावात जाण्यासाठी शेकडो किलोमीटर चालताना पाहिले तेव्हा या गोष्टीमुळे माझी झोप उडाली." सध्याच्या काळात जेव्हा लोकं सोशल डिस्टंसिंग स्वीकारत त्यांच्या घरात आहेत, अशा परिस्थितीत आंशिक लॉकआउट दरम्यान अनेक राज्य सरकारांकडून विशेष मंजुरी मिळाल्यानंतर सोनू प्रवासी मजुरांसाठी अनेक बसेसची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार सोनू कमीतकमी 45,000 लोकांना जेवण आणि किराणा सामान पुरवित आहे, जे आंशिक लॉकडाउनमध्ये संघर्ष करीत आहेत.