अफगाणिस्तानकडून बांग्लादेश संघाचा पराभव, शाकीब अल हसन याने घेतला मोठा निर्णय

या सामन्यात अफगाणिस्तान संघाने उत्तम कामगिरी करत बांग्लादेशच्या संघाला 224 धावांनी मात केले. बांग्लादेशच्या संघाला उत्तम संघापैकी एक मानले जाते. परंतु, अफगाणिस्तानच्या संघाकडून पराभवानंतर बांग्लादेशचा संघाला मोठा धक्का बसला आहे. तसेच कर्णधार शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शाकीब याने त्याचा विकेट लवकर गमवल्यामुळे बांग्लादेशच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला, असे वक्तव्य शाकीबने केले.

Shakib Al Hasan (Getty Images)

बांग्लादेश आणि  अफगाणिस्तान (Bangladesh Vs Afghanistan) यांच्यात सोमवारी पहिला कसोटी सामना (Test Match) पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने उत्तम कामगिरी करत बांग्लादेशच्या संघाला 224 धावांनी मात केले. बांग्लादेशच्या संघाला उत्तम संघापैकी एक मानले जाते. परंतु, अफगाणिस्तानच्या संघाकडून पराभवानंतर बांग्लादेशचा संघाला मोठा धक्का बसला आहे. तसेच कर्णधार शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan)  कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शाकीबने त्याचा विकेट लवकर गमवल्यामुळे  संघाला पराभव स्वीकारावा लागला, असे वक्तव्य शाकीबने केले.

एका क्रिकेट बेवसाईटला मुलाखात देताना शाकीब म्हणाला की, "त्याचे कर्णधार पद सोडण्याची वेळ आली आहे. कर्णधार पद सोडण्याचा निर्णय त्याच्यासाठी योग्यच आहे. जर कर्णधार पद त्याच्याकडे असेल तर, बांग्लादेशच्या खेळांडूशी त्याला यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे." चिटगांव येथील पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेर बांग्लादेश संघाने ६ विकेट गमावून केवळ १३६ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर सामन्याच्या पहिल्या चेंडूवर शाकीबने त्याचा विकेट गमवला. त्यामुळे शाकीबने स्वत:वर नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्याच्या पराभवाला शाकिब जबाबदार असल्याचे त्याने स्वत: म्हटले आहे. हे देखील वाचा- PAK vs SL: श्रीलंका क्रिकेट संघातील Lasith Malinga, Angelo Mathews सह 'या' खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत घेतली पाकिस्तान दौऱ्यातुन माघार

सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बांग्लादेशासाठी सर्वाधिक धावा करणारा शाकीब ठरला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शाकीबने ४४ धावांची खेळी केली आहे. शाकीब आणि सौम्य सरकार यांच्यात सातव्या विकेटसाठी १८ धावांची भागेदारी झाली होती. अफगाणिस्तानचा गोलंदाज जहीर खान (Zahir Khan) याने शाकीबला बाद केले. रशीद खान (Rashid Khan) याच्या गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा संघ संघर्ष करताना दिसला आहे. या सामन्यात रशीदने सामनावीर म्हणून किताब पटकवला आहे. रशीदने पहिल्या इंनिंगमध्ये ५ तर, दुसऱ्या इनिंगमध्ये ६ विकेट घेतले आहेत.