सँडपेपर विवाद, स्पॉट फिक्सिंग विवाद; क्रिकेट इतिहासातील 'या' 5 विवादास्पद घटनांनी खेळावर फासली काळिमा

मात्र, क्रिकेटच्या इतिहासात आजवर आपण अशा अनेक घटना पहिल्या आहेत, जे याला अपवाद आहे. क्रिकेट इतिहासात अशा अनेक घटना घडल्या ज्या लज्जास्पद होत्या. क्रिकेटच्या वादांशी तुमची ओळख करुन देताना आम्ही तुम्हाला क्रिकेटमधील काही खास वादांबद्दल सांगू इच्छितो जे इतिहासात महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

हरभजन सिंह-अँड्र्यू सायमंड्स (Photo Credit: Getty)

क्रिकेटला (Cricket) सज्जनांचा (जेंटलमॅन) खेळ असे म्हटले जाते. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात आजवर आपण अशा अनेक घटना पहिल्या आहेत, जे याला अपवाद आहे. क्रिकेट इतिहासात अशा अनेक घटना घडल्या ज्या लज्जास्पद होत्या. क्रिकेट इतिहासामध्ये अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत, ज्याच्या खूप चर्चा झाल्या आणि आजची चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. क्रिकेट आणि वाद यांच्यातील संबंध खेळाइतकेच जुने आहे. भारतीय क्रिकेटही वादांपासून वेगळे राहू शकले नाही. आजवर खेळ आणि भारतीय क्रिकेट खेळाडू वादांच्या जाळ्यात सापळ्यात अडकलेले आपण पहिले आहेत. मॅच फिक्सिंगपासून (Match Fixing) मारामारीपर्यंत, बॉल टेंपरिंगपासून (Ball-Tampering) युक्तिवाद पर्यंतच्या प्रत्येक गोष्टी, गेल्या काही शतकांमध्ये क्रिकेटने सर्व काही पाहिले आहे. (Cricket Fact: तीन फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया आहे एकमेव टीम, 'हा' चकित करणारा रेकॉर्ड जाणून क्रिकेट प्रेमीला वाटेल अभिमान)

क्रिकेटच्या वादांशी तुमची ओळख करुन देताना आम्ही तुम्हाला क्रिकेटमधील काही खास वादांबद्दल सांगू इच्छितो जे इतिहासात महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

ट्रेवर चॅपल अंडरआर्म बॉलिंग

फेब्रुवारी 1, 1981 रोजी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील वनडे सामन्यात ट्रेव्हर चॅपेलने अखेरचा चेंडू अंडरआर्म गोलंदाजी करत न्युझीलंडच्या फलंदाज ब्रायन मॅककेनीला टाकला. ही सूचना त्याला त्याच्या मोठा भाऊ आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चॅपल यांच्याकडून मिळाली होती. सामन्यात बरोबरी करण्यासाठी किवी टीमला अखेरच्या चेंडूवर एका षटकाराची गरज होती.न्यूझीलंड संघाला खेळात कोणत्याही प्रकारे पुनरागमन करण्याची संधी न देण्यासाठी चॅपेलने अंडरआर्म चेंडू टाकण्याची सूचना दिली होती. ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला. मात्र, बऱ्याच वादानंतर अंडरआर्म बॉलिंगवर बंदी घालण्यात आली.

मॅच फिक्सिंग घोटाळा

फिक्सिंग हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद कृत्य आहे. पैशाच्या लोभापायी एखाद्या खेळाडूने सामना फिक्स केल्याच्या आजवर बऱ्याच घटना घडल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सलीम मलिकला 2000 मध्ये फिक्सिंगसाठी बंदी घातली होती. तो अशा आरोपात सापडणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होता. याशिवाय अशा प्रकरणात मोहम्मद अझरुद्दीन, हॅन्सी क्रोन्जे, हर्शल गिब्स, लू व्हिन्सेंट, मार्लन सॅम्युएल्स, मोहम्मद अशरफुल, अजय जडेजा, दानिश कनेरिया, मोहम्मद अमीर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट यांसारख्या नावाजलेल्या खेळाडूंची नावे फिक्सिंगमध्ये आली होती.

शाहिद आफ्रिदी-गौतम गंभीरची टक्कर

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट जगातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी म्हणून ओलकाचे जातात. 2007 मध्ये कानपूर वनडे सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळाले. गंभीरने आफ्रिदीला चौकार मारल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर खेळपट्टीवर त्यांची टक्कर झाली आणि प्रकरण मिटवण्यासाठी अंपायर इयान गोल्ड यांना हस्तक्षेप करावा लागला.

मंकी गेट विवाद

भारताच्या 2008 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सर्वात अप्रसिद्ध घटना. हा वाद सिडनी कसोटीत हरभजन सिंह आणि अँड्रयू सायमंड दरम्यान झाला होता. हरभजनने सायमंडला माकड म्हणून संबोधले होते, त्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये बरेच वाद झाले. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील ही कधीही न विसरला जाणारी घटना आहे.

सँडपेपर विवाद

ऑस्ट्रेलियाच्या 2018 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर या प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेले. कसोटी मालिकेत 1-1ने बरोबरीनंतर तिसऱ्या सामन्यात कॅमेरून बॅनक्रॉफ्टला रिव्हर्स-स्विंगसाठी अनुकूल होण्यासाठी चेंडू सँडपेपरच्या साहाय्याने घासताना पकडण्यात आले. त्यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरनेही प्रकरणात सहभाग कबूल केला. बंदीनंतर ते ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परतले असले तरी त्यांची प्रतिष्ठा कायमच कलंकित राहील असे प्रत्येकाला वाटते.

दरम्यान, मागील काही वर्षांमध्येही आपण क्रिकेटपटूंशी निगडित अनेक विवाद पाहायला मिळाले. यात हार्दिक पांड्या-केएल राहुल यांच्या कॉफी विथ करण एपिसोडपासून, आयपीएल फिक्सिंग असे विवाद आहे ज्यांनी क्रिकेटवर काळिमा फसली. हे सर्व विवाद असूनही क्रिकेट हा जगातील सर्वाधिक पसंत केला जाणारा खेळ आहे.