Rohit Sharma’s New Look for IPL 2020! इंडियन प्रीमियर लीग 13 साठी मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्माने बदलला लुक, पाहा फोटो
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2020 दरम्यान रोहित शर्मा गेतजेता मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मैदानावर पुनरागमन करेल. मुंबई इंडियन्सच्या शिबिरात उतरण्यापूर्वी रोहितने आपल्या नव्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. मुंबई कर्णधाराने जिम सेशन करत असताना एक क्लिप शेअर केली ज्यात त्याचा नवीन लुक सर्वांसमोर आला.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) मार्चपासून अनेक भारतीय खेळाडू सध्या घरातच कैद आहेत. भारताचा सलामी फलंदाज रोहितने काही आठवड्यांपूर्वी प्रशिक्षण पुन्हा सुरू केले पण तो फेब्रुवारीपासून खेळापासून दूर आहे. इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 दरम्यान रोहित गेतजेता मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार म्हणून मैदानावर पुनरागमन करेल. रोहित आधीपासूनच शहरात आहे आणि लवकरच संघातील इतर सदस्यांमध्ये सामील होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या शिबिरात उतरण्यापूर्वी रोहितने आपल्या नव्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. गुरुवारी मुंबईच्या कर्णधाराने जिम सेशन करत असताना एक क्लिप शेअर केली ज्यात त्याचा नवीन लुक सर्वांसमोर आला. रोहितच्या भारी काळी दाढी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी स्वतःला घरी पूर्वीच क्वारंटाइन केले आहे. अशा स्थितीत रोहित जिममध्ये कसून मेहनत करताना दिसत आहे. (IPL 2020: रोहित शर्माला सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॅक पुन्हा हवे आहेत मुंबई इंडियन्स संघात, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर)
त्याला अनेक दाढीत खेळताना पाहिले गेले आहे पण असे दिसते आहे की रोहित बराच काळ नाईला गेला नाही आहे. त्याचा नवीन लुक पहा -
View this post on Instagram
Going low only to push yourself higher.
A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on
चार वेळाच्या आयपीएल चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सने खेळाडूंना क्वारंटाइन करण्यास सुरवात केली असून रोहित मुंबईत राहत असल्याने खेळाडूंनी युएईला जाण्यासाठी काही दिवस अगोदरच तो टीममध्ये सामील होण्याची आहे. मुंबई टीम युएई येथे कधी रवाना होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयने 20 ऑगस्टनंतर फ्रँचायझींना युएईला रवाना होण्यास सांगितले आहे. तिसर्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा चौथ्या आठवड्यात मुंबईचा संघ केवळ रवाना होऊ शकतो. ते भारतात कोणतेही प्रशिक्षण शिबिर घेणार नाहीत. आगामी हंगामात रोहित आणि हार्दिक पांड्याचे बर्याचा दिवसानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन होईल. रोहित अखेर न्यूझीलंड दौऱ्यावर खेळला होता, तर सप्टेंबर 2019 नंतर एकही आंतराष्ट्रीय सामना खेळला नाही. पांड्याने डीवाय पाटील टी-20 स्पर्धा खेळली आणि ज्यानंतर त्याची दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी निवड झाली, जी पुढे ढकलण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)