केदार जाधव याला इंस्टाग्रामवर स्टाईलिश फोटो शेअर करणे पडले महागात, रोहित शर्मा याने उडवली खिल्ली, पाहा Post

केदारने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो हातात बॅट आणि डोळ्यांवर चषमा लावलेला दिसत आहे. या फोटोवर त्याचा साथीदार रोहित शर्मा याने त्याची खिल्ली उडविली.

केदार जाधव आणि रोहित शर्मा (Photo Credit: Facebook)

टीम इंडियाच्या क्रिकेटपटू सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवत असतात. भारतीय घरगुती क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) आता सज्ज झाली आहे. मागील महिन्यात भारताची सर्वात मोठी देशांतर्गत वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी आणि सर्वात मोठी टी -20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या महिन्याच्या पहिल्या तारखेला संपुष्टात आली आहे. रणजी करंडक 2019-20 सत्र काही दिवसात सुरू होईल. 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी हंगामासाठी, सर्व संघांनी मैदानात तयारी सुरू केली आहे. भारतीय संघात वनडे संघातील मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) यानेही आपल्या रणजी ट्रॉफी संघ महाराष्ट्रासाठी (Maharashtra) तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या रणजी संघाचा अनुभवी फलंदाज, केदार रणजीच्या तयारीसाठी संघात सामील झाला आहे. खुद्द केदारने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. (Ranji Trophy 2019-20: विजय शंकर याची तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती, सूर्यकुमार यादव करणार मुंबईचे नेतृत्व)

केदारने रणजी ट्रॉफी टूर्नामेंटआधी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, “मैदानावर परत आल्यावर बरे वाटले. आणि मला जे करण्यास आवडते ते करणे चांगले वाटते." केदारने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो हातात बॅट आणि डोळ्यांवर चषमा लावलेला दिसत आहे. या फोटोवर त्याचा साथीदार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याची खिल्ली उडविली. या फोटोवर प्रतिक्रिया देताना रोहितने लिहिले की "पोझ कमी कर, फलंदाजी कर थोडी". पाहा केदारचा हा स्टायलिश फोटो:

 

View this post on Instagram

 

Feels good to be back on the field and do what I like to do. 🏏🙂 #ranjitrophy @sareen_sports

A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

रोहितची प्रतिक्रीया:

केदारचा यापूर्वी भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला होता पण तिथे तो अपयशी ठरला. यानंतर आता आगामी वेस्ट इंडिजविरूद्ध आगामी वनडे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. विंडीजविरुद्ध वनडे मालिका 15 डिसेंबरपासून सुरु होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif