IPL 2023: आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आयपीएलच्या 3500 धावा पूर्ण
IPL 2023 चा 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपरजायंट्स (LSG) यांच्यात खेळला जात आहे.
आयपीएल (IPL) ही भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये भारतीय खेळाडूंशिवाय अनेक परदेशी खेळाडूही गेली अनेक वर्षे क्रिकेट खेळत आहेत आणि विक्रम करत आहेत. अशा परिस्थितीत फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) असे एका खेळाडूचे नाव आहे, जो या हंगामात आरसीबीचे नेतृत्व करत आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत असून त्याने आता आपल्या 3,500 धावा पूर्ण केल्या आहेत. IPL 2023 चा 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपरजायंट्स (LSG) यांच्यात खेळला जात आहे.
हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीसाठी प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने शानदार सुरुवात केली. यादरम्यान कर्णधार फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये आपल्या 3,500 धावा काही वेळात पूर्ण केल्या. हेही वाचा Shikhar Dhwan VIDEO: IPL दरम्यान शिखर धवनचा व्हिडिओ लीक, पहा नेमकं काय म्हणाला ?
फाफच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर हा खेळाडू 2012 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून क्रिकेट खेळला आहे. फॅफने 2012 ते 2021 या कालावधीत धोनीच्या टीमकडून आयपीएल खेळला, पण 2022 मध्ये तो विराट कोहलीच्या आयपीएल टीम आरसीबीमध्ये आला आणि त्याने कर्णधारपदही स्वीकारले.
फाफने आयपीएलमधील 119 सामन्यांमध्ये 112 डाव खेळले असून ही बातमी लिहिपर्यंत त्याने 3,552 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 35.16 आणि स्ट्राइक रेट 131.65 आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत, फॅफने 27 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 आहे. IPL 2023 च्या 15 व्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, RCB ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट गमावून 212 धावा केल्या. हेही वाचा Mitchell Marsh-Greta Mack Wedding Photos: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू Mitchell Marsh अडकला विवाहबंधनात; पहा फोटोज
या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूत 171.74 च्या स्ट्राईक रेटने 79 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलनेही 29 चेंडूत 203.45 च्या स्ट्राईक रेटने 59 धावांची खेळी केली. या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या दोघांपूर्वी विराट कोहलीही या सामन्यात आपल्या संघाला वेगवान सुरुवात करून देत अमित मिश्राचा बळी ठरला. विराटने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती, ज्यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले होते.