कोच रवि शास्त्री या फोटो मुळे झाले ट्रोल

दुसरा कसोटी सामना एक दिवस अगोदर संपल्यामुळे भारतीय संघाला जमाईका येथील सौदर्य पाहण्यासाठी वेळ मिळाला होता. या दरम्यान भारतीय संघाचे मुख्यप्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही ही संधी सोडली नाही. रवी शास्त्री यांनी जमाईकातील (Jamaica) एटिंगा येथील समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटताना एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

Ravi Shastri ( Photo Credit: Twitter)

वेस्टइंडीज दौऱ्यावर (India Vs Westindies) गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाने (Team India) एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी सामन्यात एकहाती विजय मिळवला आहे. दुसरा कसोटी सामना एक दिवस अगोदर संपल्यामुळे भारतीय संघाला जमाईका येथील सौदर्य पाहण्यासाठी वेळ मिळाला होता. या दरम्यान भारतीय संघाचे मुख्यप्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही ही संधी सोडली नाही. रवी शास्त्री यांनी जमाईकातील (Jamaica) एटिंगा येथील समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटताना एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

वेस्टइंडीज संघाविरोधात भारतीय क्रिकेट संघाने उत्तम कामगिरी करुन चाहत्यांचे मन जिंकले आहे. परंतु भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वागणूकीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाला मात देवून ही मालिका आपल्या नावावर केली आहे. हा सामना एक दिवस आधिच संपल्यामुळे भारतीय संघाला वेस्ट इंडीज येथील आकर्षित ठिकाणी भेट देता आली आहे. या दरम्यान, रवी शास्त्री यांनी जमाईकातील एटिंगा येथील समुद्र किनाऱ्यावर मद्यपान करत असलेला फोटो शेअर केला आहे. तसेच एटिंगा येथील सुर्य प्रकाशावर मात देण्यासाठी एकमेव उपाय, अशी पोस्ट केली आहे. यामुळे ट्रोलर्सने रवी शास्त्री यांना टोकावर धरले आहे. महत्वाचे- US Open 2019: रॉजर फेडरर याला पहिल्या सेटमध्ये मात देणाऱ्या सुमित नागल याने मानले विराट कोहली याचे आभार

ट्विट-

ट्रोलर्सकडून रवी शास्त्री यांची खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रवी शास्त्री यांचे हे ट्विट ट्रोल केले जात आहे.

गर्मीला मात देण्यासाठी हा योग्य उपाय नसल्याचा किक्रेट चाहते म्हणाले.  वेस्ट इंडीजच्या दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण अफ्रिकेशी लढत देणार आहे. भारत विरुद्द दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला सामना 15 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. .