IND vs PAK, ICC Cricket World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो, हे असू शकते कारण
ब्रिटीश हवामानाशी परिचित असलेले लोक त्यांच्या अप्रत्याशित स्वभावाची खात्री बाळगू शकतात.
अक्ख क्रिकेट विश्व ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असते तो म्हणजे भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan)! येत्या 16 जूनला दोन्ही संघ मॅन्चेस्टरच्या क्रिकेट मैदानात आमने-सामने येतील. पण सामन्याआधीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे जी दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमींना निराश करणारी आहे. ब्रिटनच्या हवामान विभागानुसार, या रविवारी मॅन्चेस्टर मध्ये ऊन-पावसात लपाछपी सुरु राहील. ब्रिटीश हवामानाशी परिचित असलेले लोक त्यांच्या अप्रत्याशित स्वभावाची खात्री बाळगू शकतात. (क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील India vs Pak सामन्यावरुन पाकिस्तानच्या Jazz TV वर जाहिरात, विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रतिमेचा वादग्रस्त पद्धतीने वापर)
अशात परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानी मधील सामना रद्द होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगितले जात आहे. सध्या इंग्लंडच्या बदलत्या हवामानामुळे बरेच वर्ल्ड कपचे सामने रद्द करण्यात आले आहे.
यंदा होणारा भारत-पाकिस्तान सामना हा ह्या दोन्ही संघांमधील सातवा सामना असेल आणि हैस दोन्ही संघांमधला आजवरचा इतिहास पाहता, आजवर ICC विश्वचषकाच्या सहा सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघ भारताला एकदाही हरवू शकला नाहीये. त्यामुळे येत्या रविवारच्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध आपल्या विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवणार की पाकिस्तानी संघ मौक्यावर चौक मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.