विश्वचषक नेमबाजीत राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी, टोकियो ऑलिम्पिक 2020 चे तिकीट पक्के

कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने जर्मनी येथे सुरु असणाऱ्या विश्वचषक नेमबाजी मध्ये सुवर्ण पदक मिळवून टोकियो ऑलम्पिक मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

Rahi Sarnobat (Photo Credits: Instgram/ Rahi Sarnobat)

कोल्हापूरच्या (Kolhapur) रांगड्या मातीतील अस्सल मराठमोळी मुलगी राही सरनोबत (Rahi Sarnobat) हिने जर्मनी (Germany)  येथे चालू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण यश प्राप्त केले आहे. राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात तब्बल 37 पॉइंट्सची कमाई करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. या विक्रमी विजयानंतर 2020 च्या टोकियो ऑलम्पिकची (Tokiyo Olympic) कवाडं तिच्यासाठी उघडली आहेत.यासोबतच टोकियो ऑलिम्पिकसाठी 25 मीटर पिस्टल प्रकारातून पात्र ठरलेली राही ही पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे.

25 मीटर पिस्टल नेमबाजीचा सामना जर्मनीमध्ये सोमवारी पार पडला ज्यात राहीने तब्बल ३७ निशाणे साधत विजय आपल्या नावी करून घेतला मात्र भारताची  दुसरी नेमबाज मनू भाकर हिला पिस्तुलीत बिघाड झाल्यामुळे पाचव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. यापूर्वी देखील आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणारी राही ही पहिली भारतीय महिला खेळाडू होती. 2013 मध्ये चँगवान विश्वचषक सामन्यात देखील तिने गोल्ड मेडल मिळवले होते,याशिवाय भारतीय खेळाडूंना मिळणारा मानाचा अर्जुन पुरस्कार देखील राहीने पटकावला आहे. सुवर्णकन्या राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर; करवीरनगरीत आनंदाची लाट

जर्मनी मध्ये सुरु असणाऱ्या सामन्यात रविवारी अपूर्वी चंडोला हिने महिलांच्या तर सौरभ चौधरी याने पुरुषांच्या दहा मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाचे कमाई केली होती यापाठोपाठ राहीने मिळवलेल्या या यशाने भारत आता विश्वचषक सामन्यात तीन गोल्ड मेडल्स सोबत तिसऱ्या स्थानी आहे.