Pro Kabaddi 2019: तामिळ थालाइवास आणि यूपी योद्धा यांच्यातील रोमांचक सामना टाय

हा सामना कोणीही जिंकला नाही आणि तो 28-28 असा बरोबरीत झाला.

(Photo Credit: @ProKabaddi/Twitter)

यंदाच्या प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) 29 व्या सामन्यात यूपी योद्धा (UP Yoddha) आणि तमिळ थालाईवास (Tamil Thalaivas) यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. हा सामना कोणीही जिंकला नाही आणि तो 28-28 असा बरोबरीत झाला. यंदाच्या हंगामातील यूपी संघाचा हा दुसरा सामना टाय झाला, तर या मोसमातील तमिळसाठीची ही पहिली टाय होती. या सामन्यातील पूर्वार्धानंतर यूपीचा संघ 16-11 ने पुढे होता. पहिल्या 20 मिनिटांत उत्तर प्रदेशची अष्टपैलू कामगिरी चांगली झाली. यूपी वॉरियरकडून रेडिंगमध्ये रिशांक देवाडिगाने तीन आणि मोनू गोयतने दोन गुण मिळवले. त्याचबरोबर, पूर्वार्धात तमिळ थलाईवासच्या राहुल चौधरीने तीन गुण मिळवले.

डिफेन्समध्ये सुमीत आणि आशु सिंह यांनी यूपीकडून चांगली कामगिरी केली आणि संघाला धार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या उत्तरार्धात एकदा तमिळ थालाईवास ऑल-आऊट झाला होता. दुसर्‍या हाफमध्ये देखील दोन्ही संघात एक अतिशय रोमांचक संघर्ष बघायला मिळाला. आणि 31 व्या मिनिटाला, यूपी वॉरियर ऑलआऊट झाला आणि सामान 23-23 ने बरोबरी झाला. 36 व्या मिनिटाला पुन्हा दोन्ही संघाने 26-26 अशी बरोबरी साधली. यानंतरही दोन्ही संघांनी एकमेकांना आघाडी मिळू दिली नाही आणि अखेरीस सामना 28-28 असा बरोबरीत संपला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif