Pro Kabaddi 2019: जयपुर पिंक पैंथर्स कडून पटना पाइरेट्स यांचा 34-21 ने पराभव

प्रो कबड्डी लीगच्या 23 व्या सामन्यात जयपुर पिंक पैंथर्स संघाने पटना पाइरेट्स यांचा 34-21 असा पराभव केला.

Jaipur Pink Panthers Winning Hat Trick (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) 23 व्या सामन्यात जयपुर पिंक पैंथर्स (Jaiupur Pink Pathers) संघाने पटना पाइरेट्स (Patna Pairates) यांचा 34-21 असा पराभव केला. संदीप धुल्ल आणि अमित हूडा यांच्या नेतृत्वाखालील पँथर्सच्या संरक्षणाने पटनाच्या धोकादायक पुरुष परदीप नरवालविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी बजावली. नरवाल याने पटनासाठी सर्वाधिक नऊ गुणांची कामगिरी केली. धुल्लने सरोत्तम बचावात्मक कामगिरी केली आणि तब्बल आठ टॅकल पॉईंट मिळवले. दुसरीकडे, दीपक नरवालने आठ रेड पॉईंट्स मिळवले. पटना पायरेट्ससाठी, पर्याय म्हणून आलेल्या मोनूने पाच अंक मिळवून संघासाठी उच्च कामगिरी केली. प्रदीपने पहिल्याच मिनिटात रेड पॉईंटसह पटना पायरेट्सचे खाते उघडले. संदीपने त्याचा 150 वा रेड पॉईंट्स मिळवत पायरेट्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या मिनिटाला अमितने जंग कुन कुन लीवर विजय मिळवला आणि दोन्ही संघ 3-3 अश्या बरोबरीला आले.

सहाव्या मिनिटाला अजिंक्य पवारने दोन गुणांसह जयपूर पिंक पँथर्सला 5-3 अशी आघाडी मिळवून दिली. नवव्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सने 11-4 अशी आघाडी घेतली. पहिल्या हाफच्या अखेरीस जयपूर पिंक पँथर्सने 15-9 अशी आघाडी घेतली.  दुसऱ्या हाल्फमध्ये जयपूर पिंक पँथर्सने आपले वर्चस्व कायम राखत सुरुवात केली. नरवालने 23 व्या मिनिटाला दोन गुणांसह पँथर्सला 18-1 अशी आघाडी मिळवून दिली. पटनाच्या पुनरागमनच्या आशा पुन्हा उंचावण्यासाठी प्रदीपने तीन रेड पॉईंट्स मिळवले आणि 26 मिनिटांनी पिछाडीला असलेल्या पटणाला 14-18 असे नेऊन पोहचवले. 30 व्या मिनिटाला दीपकने जयपूर पिंक पँथर्सला 24-14 अशी आघाडी मिळवून दिली.

पटनासाठी परदीप एकमेव एकमेव झुंज देत राहिला. त्याची ही झुंज अपयशी राहिली आणि संघ दहा गुणांनी पिछाडीवर पडला.

जयपूरचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर पटना सातव्या स्थानावर आहे.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif