Wimbledon 2019: राफेल नदाल याला पराभूत करून रोजर फेडरर 12 व्या विंबल्डन फाइनलमध्ये, अंतिम फेरीत नोवाक जोकोविच याचे आव्हान

टेनिस जगताचा महान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडचा रोजर फेडरर याने शुक्रवारी स्पेनच्या राफेल नदाल याला चार सेट्समध्ये नमवून विंबल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

(Photo by Matthias Hangst/Getty Images)

टेनिस जगताचा महान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडचा रोजर फेडरर (Roger Federer) याने शुक्रवारी स्पेनच्या राफेल नदाल (Rafael Nadal) याला चार सेट्समध्ये नमवून विंबल्डन (Wimbledon) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फेडरर 12 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. फेडररने नदालला 16 वेळा पराभूत केले आहे. आता अंतिम फेरीत फेडेरेरला नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याचे आव्हान असणार आहे. विंबल्डनच्या पुरुष एकेरीत फेडरर जोकोविचला पराभूत करणार का, याची सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Wimbledon 2019: बारबोरा स्ट्राइकोवाचा दाणून पराभव करत सेरेना विलियम्स विंबलडनच्या फायनलमध्ये, आता लढत सिमोना हालेपशी)

रॉजर आपल्या करिअरमध्ये तब्बल आठवेळा विंबल्डन किताब पटकावले आहेत. अंतिम फेरीत त्याची टक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच याच्याशी होणार आहे. फायनल गाठण्यासाठी सेंटर कोर्टवर झालेल्या चुरशीच्या लढतीत फेडररने नदालचा 7-6, 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये फेडरर आणि नदाल यांच्यामधील लढत रंगतदार होती. हा सेट फेडररने टाय ब्रेकमध्ये जिंकला. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची फेडररची ही ३१वी वेळ आहे.

फेडररने एकूण 20 ग्रँडस्लॅम सिंगल्सचे विजेतेपद जिंकले आहेत. फेडरर हा अव्वल क्रमांकावर आहे. राफेल नडालने 18 आणि नोवाक जोकोविचने 15 जिंकले असून हे दोघे क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक आहेत.