Tokyo Olympic Qualifiers: विकास कृष्ण, गौरव सोलंकी यांचा ऑलिम्पिक क्वालिफायर्ससाठी 8-सदस्यीय भारतीय बॉक्सिंग संघात समावेश

माजी विश्वविजेतेपद कांस्यपदक विजेता विकास कृष्ण आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकी याने प्रथम ऑलिम्पिक पात्रतेसाठी 8 भारतीय पुरुषांच्या बॉक्सिंग संघात स्थान मिळवले आहे. कृष्णनने 69 किलो आणि सोलंकीने 57 किलो ग्रॅम वर्गात स्थान निश्चित केले आहे.

मेरी कोम आणि विकास कृष्ण (Photo Credits : Twitter/IOA)

माजी विश्वविजेतेपद कांस्यपदक विजेता विकास कृष्ण (Vikas Krishan) आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकी (Gaurav Solanki) याने प्रथम ऑलिम्पिक (Olympics) पात्रतेसाठी 8 भारतीय पुरुषांच्या बॉक्सिंग संघात स्थान मिळवले आहे. कृष्णनने 69 किलो आणि सोलंकीने 57 किलो ग्रॅम वर्गात स्थान निश्चित केले आहे. या दोघांव्यतिरिक्त आशिष कुमार (75 किलो), सचिन कुमार (81 किलोग्राम), नमन तंवर (91 किलो) आणि सतीश कुमार (91+ किलो) यांचाही समावेश आहे. सोमवारी हा कार्यक्रम बेल्लारी येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट येथे आयोजित करण्यात आला होता. अमित पंघाल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) यांनी यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून अनुक्रमे रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून संघात थेट प्रवेश मिळवला होता. माजी विश्वविजेतेपदाचा आणि आशियाईमध्ये पदक जिंकणारा विकास बराच काळ 75 किलोग्रॅममध्ये खेळत राहिला पण पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने 69 किलो वजनी गटात पुनरागमन केले. यापूर्वी दोनदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या 26 वर्षीय विकासने एकमताने घेतलेल्या निर्णयामध्ये दुर्योधन सिंग नेगीला चाचण्या अंतिम फेरीत पराभूत केले.

चीनमध्ये 3 ते 14 फेब्रुवारी दरम्यान एशिया ओशिनिया रीजनल क्वालिफायर होतील. अत्यंत स्पर्धात्मक 57 किलो वजनी गटात सोलंकीने अंतिम फेरीत थायलंड ओपन रौप्यपदक विजेता मोहम्मद हुसमुद्दीनवर कामगिरीची पुनरावृत्ती केली आणिक्वालिफायर्समध्ये स्थान निश्चित केले. दोन वेळा ऑलिम्पियन विकासने 69 किलोमध्ये आशिष कुल्हेरिया आणि राष्ट्रीय पदकविजेते दुर्योधन सिंह नेगी यांच्याविरुद्ध विजय मिळवून प्रथमच ऑलिम्पिक पदक मिळवण्याचा आव्हान कायम ठेवलं. 91 किलोमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा नमन तंवरने तोडीच्या झालेल्या स्पर्धेत नवीन कुमारला पराभूत केले. रविवारी आशियाई चँपियनशिपमध्ये रौप्यपदक विजेता आशिष, सचिन आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेते सतीशने अंतिम फेरीत विजय मिळवून संघात स्थान मिळविले.

51 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत ज्युनियर विश्वविजेत्या निखात जरीन (Nikhat Zareen) हीचा 9-1 ने पराभव करत भारतीय बॉक्सिंगची दिग्गज मेरी कॉम (Mary Kom) हिने शनिवारी ऑलिम्पिक पात्रतांमध्ये आपले स्थान निश्चित केले. मेरीसह सिमरनजीत कौर नेही 60 किलोग्राम फायनलमध्ये सरिता देवी (Sarita Devi) विरुद्ध चांगली कामगिरी केल्यामुळे तिचे स्थान निश्चित केले. साक्षी चौधरी (57 किलो), लवलिना बोरगोहेन (69 किलोग्राम) आणि पूजा राणी (75 किलोग्राम) भारताच्या प्रतिनिधीत्व करणार्या अन्य महिला बॉक्सर असतील.

ऑलिम्पिक पात्रता गटात भारतीय महिला संघ: मेरी कोम (51 किलो), साक्षी चौधरी (57 किलो), सिमरनजित कौर (60 किलो), लोव्हलिना बोरगोहेन (69 किलो) आणि पूजा राणी (75 किलो).

ऑलिम्पिक पात्रता गटात भारतीय पुरुष संघ: अमित पन्हाळ (52 किलो), गौरव सोलंकी (57 किलो), मनीष कौशिक (63 किलोग्राम), विकास कृष्ण (69 किलो), आशिष कुमार (75 किलो), सचिन कुमार (81 किलो), नमन तंवर (91 किलोग्राम) आणि सतीश कुमार (91+ किलो)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now