IPL Auction 2025 Live

US Open 2020: नोवाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेतून आऊट, लाइन ऑफिशिअलला चेंडू मारल्यानंतर केले निलंबित (Watch Video)

18 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या शोधात असणाऱ्या जोकोविचचे आवाहन विचित्र पद्धतीने संपुष्टात आले.

नोवाक जोकोविच (Photo Credits: AFP)

जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) रविवारी यूएस ओपनच्या (US Open) प्री-क्वार्टर फायनल सामन्यादरम्यान स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आणि यामागील कारणही काहीसं चकित करणार आहे. 18 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या शोधात असणाऱ्या जोकोविचचे आवाहन विचित्र पद्धतीने संपुष्टात आले. पाब्लो कारेनो बुस्टाविरुद्ध (Pablo Carreno Busta) चौथ्या फेरीच्या लढतीच्या पहिल्या सेट दरम्यान एका लाइन अधिकाऱ्याला जोकोविचने मारलेला चेंडू नकळत लागला. नंतर त्याने इन्स्टाग्रामवर याबद्दल माफी मागितली. जोकोविचने या घटनेचे वर्णन अत्यंत खेदजनक व चुकीचे केले. अमेरिकन टेनिस असोसिएशनने (USTA) सर्बियन स्टार जोकोविचबद्दल निवेदनाची पुष्टी केली. जर एखाद्या खेळाडूने एखाद्या अधिकाऱ्याला किंवा प्रेक्षकाला दुखापत केली तर त्याला दंडासह अपात्र घोषित केले जाते असाग्रँड स्लॅमचा नियम आहे. मॅच रेफरीने जोकोविचला दोषी ठरवले आणि बाहेर केले. इतकंच नाही तर नियमांनुसार, यूएस ओपनच्या प्री-क्वार्टर सामन्यात जोकोविचला मिळणारी रक्कम दंड म्हणून वजा केली जाईल. जोकोविचच्या चुकीमुळे त्याचा रँकिंग पॉईंट देखील कमी होईल. (US Open 2020: भारत-सर्बियन दुहेरी जोडी दिविज शरण-निकोला कॅसिक क्रॅस पहिल्या फेरीत पराभवासह ग्रँड स्लॅम स्पर्धेतून आऊट)

जोकोविचला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, पण आता तो यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे, यंदा अमेरिकन ओपनला नवीन विजेता मिळणार हे नक्की झालं. पहिल्या सेटमध्ये जोकोविच स्पेनच्या बुस्टाविरुद्ध 5-6 असा पिछाडीवर होता, त्यादरम्यान एक गुण गमावल्यामुळे यो निराश झाला आणि चेंडूवर संताप व्यक्त केला. पण चेंडू थेट लाइनवूमनच्या खांद्यावर लागला. मात्र त्यानंतर लवकरच जोकोविचने टूर्नामेंट रेफरीची माफी मागितली आणि गंभीर चर्चेनंतर त्याला बाहेर करण्यात आले. दरम्यान, जोकोविचला बाहेर केल्याने बुस्ता क्वार्टर-फायनलमध्ये पोहचला.

नोवाकने तीन वेळा यूएस ओपन स्पर्धा जिंकली, परंतु यावेळी त्याचा संताप त्याला भारी पडला. जोकोविच आपल्या कारकीर्दीतील 18 वे एकेरी जेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात होता. जोकोविचचे दोन अव्वल प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी यंदा यूएस ओपनमध्ये भाग न घेतल्याने त्याने चॅम्पियनशिप जिंकण्याची शक्यता बरीच जास्त होती.