भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंबाची सिंगापूर ते लंडन रोड ट्रीप; 50 दिवस, 17 देश, पार केले 25 हजार किमी अंतर

या कुटुंबाचे क्रिकेट आणि ड्रायव्हिगचे प्रेम असे आहे की, टीम इंडियाला चीअर करण्यासाठी 50 दिवसांत 17 देशांची सफर करून हे कुटुंब इंग्लंडला पोहचले आहे.

माथुर कुटुंब (संग्रहित संपादित प्रतिमा)

वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2019) अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सध्या भारत आणि न्युझीलंडमध्ये सेमिफायनल सामना सुरु असून, भारतीय संघाकडून चाहत्यांच्या फार जास्त अपेक्षा आहेत. भारताला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील चाहते इंग्लंडला पोहचले आहेत, यामध्ये सिंगापूरचे माथुर कुटुंब (Mathur family) प्रकाशझोतात आले आहे. या कुटुंबाचे क्रिकेट आणि ड्रायव्हिगचे प्रेम असे आहे की, टीम इंडियाला चीअर करण्यासाठी 50 दिवसांत 17 देशांची सफर करून हे कुटुंब इंग्लंडला पोहचले आहे.

या ट्रीपसाठी कुटुंबातील सहा सदस्यांनी 25,000 किलोमीटर अंतर पार केले आहे. कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी 17 मे रोजी आपल्या या प्रवासाला सुरुवात केली. 5 जुलै रोजी कुटुंब ब्रिटनच्या लीड्स शहर पोहोचले, जेणेकरून 6 जुलैचा भारत-श्रीलंकेचा सामना पाहायला मिळेल. आता त्यांना सेमीफायनल आणि 14 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा आहे. अदिती आणि अनुपम माथुर या दांपत्याच्या इच्छाशक्तीमुळे ही यात्रा पार पडली आहे. (हेही वाचा: मॅचमध्ये एम एस धोनी याने रचला इतिहास, बनला 350 वनडे सामने खेळणारा दुसरा भारतीय)

एके दिवशी जेवण करत असताना अनुपम यांनी कुटुंबासमोर ही कल्पना मांडली. आश्चर्य म्हणजे कुटुंबाने याला त्वरित उचलून धरले. सिंगापुरवरून लंडन पर्यंत घडलेल्या या ट्रीपमध्ये कुटुंबातील 3 वर्षेपासून 67 वर्षांपर्यंतच्या तीन पिढ्या सामील होत्या. सध्या कुटुंबाच्या या धाडसाचे बरेच कौतुक होत आहे.