Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला? पाकिस्तानी क्रिकेटरने केली फसवणूक- Reports

गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात सर्व काही ठीक चालले नाही, याची मीडियाला कोणत्याही स्त्रोताकडून माहिती मिळाली नव्हती. परंतु सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने यावर प्रकाश टाकला.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (Photo Credit: Facebook)

जगप्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पती शोएब मलिक (Sania Mirza) यांच्या नात्यात काही तरी बिनसले असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. सानिया मिर्झाच्या एका इंस्टाग्राम पोस्टनंतर हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. आता माहिती मिळत आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यामध्ये घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या अगदी जवळच्या व्यक्तीने इनसाइडस्पोर्ट नावाच्या वेबसाइटला ही माहिती दिली आहे. परंतु लेटेस्टी मराठी या वृत्ताची पुष्टी करत नाही.

शोएब मलिकच्या जवळच्या सहाय्यकाच्या म्हणण्यानुसार, सानिया मिर्झा आणि तिचा नवरा बराच काळ वेगळे राहत होते, पण आता दोघांनी औपचारिक घटस्फोट घेतला आहे. ज्या व्यक्तीने हा खुलासा केला तो शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे. त्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले- ‘होय, आता या दोघांचा (सानिया मिर्झा आणि शोएब मलिक) अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. मी अधिक काही उघड करू शकत नाही पण ते वेगळे झाले आहेत याची पुष्टी करू शकतो.’

उमेर संधू नावाच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, घटस्फोटानंतर सानिया मिर्झा खूप वाईट नैराश्यातून जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात सर्व काही ठीक चालले नाही, याची मीडियाला कोणत्याही स्त्रोताकडून माहिती मिळाली नव्हती. परंतु सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने यावर प्रकाश टाकला. सानियाने, ‘Where do broken hearts go. To find Allah,’ अशी स्टोरी सानियाने केली होती. परंतु नंतर ती हटवण्यात आली.

यानंतर सानिया मिर्झाने आपल्या मुलासोबतचा फोटो पोस्ट केला. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘असे क्षण, जे सर्वात कठीण दिवसांमध्ये दिलासा देतात, त्यांच्यावर मात करण्याची शक्ती देतात.’ सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम खात्यावर तिच्या मुलाची अनेक छायाचित्रे पाहायला मिळतात, परंतु गेल्या काही कालावधीमध्ये तिने शोएब मलिकचे फोटो पोस्ट केले नाहीत. सानिया मिर्झाने शोएब मलिकसोबतचा तिचा शेवटचा फोटो 40 आठवड्यांपूर्वी पोस्ट केला होता. दोघेही 2010 पासून विवाहित होते. शोएबने सानियाला फसवल्यानंतर तिने पाकिस्तानच्या माजी कर्णधारापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby: आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर शेअर केली पहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाली, आम्ही भाग्यवान आहोत)

दरम्यान, शोएब मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव आयेशा सिद्दीकी आहे. दोघांनी 2002 मध्ये लग्न केले होते. सानिया मिर्झाशी लग्न करण्याच्या 4 दिवस आधी शोएब मलिकने आयशाला घटस्फोट दिला. त्यानंतर आयशा सिद्दीकीच्या वडिलांनीही पोलिसांत तक्रार केली होती. शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झाने तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केला होता मात्र, सहा महिन्यांतच तो तुटला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now