IPL Auction 2025 Live

ग्रँड स्लॅमचा बादशाह रोजर फेडरर Basel Open मध्ये खेळणार कारकिर्दीतील 1,500 वा सामना, पीटर गोजोझिक शी होणार पहिली लढत

फेडरर बासेल ओपन स्पर्धेच्या पहिल्या मॅचसह आपल्या कारकीर्दीतील 1,500वा सामना खेळणार आहे. फेडरर 10 व्यांदा बासेल ओपन स्पर्धा जिंकण्यासाठी आजपासून मोहीम सुरु करेल.

रोजर फेडरर (Photo Credit: AP/PTI)

20 ग्रँड स्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रोजर फेडरर (Roger Federer) टेनिसमध्ये एका नवीन इतिहासाची नोंद करण्यास सज्ज आहे. फेडरर बासेल ओपन (Basel Open) स्पर्धेच्या पहिल्या मॅचसह आपल्या कारकीर्दीतील 1,500वा सामना खेळणार आहे. फेडरर 10 व्यांदा बासेल ओपन स्पर्धा जिंकण्यासाठी आजपासून मोहीम सुरु करेल. पहिल्या फेरीत फेडररचा सामना जर्मनीच्या पीटर गोजोझिक याच्याशी होईल. 20 ग्रँड स्लॅम चॅम्पियनने मागील मार्चमध्ये इंडियन वेल्स स्पर्धेसह जर्मन खेळाडूला दोनदा पराभूत केले आहे. त्यामुळे यंदाही फेडररची बाजू मजबूत दिसत आहे. शिवाय, तो त्याच्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे हेच त्याचे मनोबल वाढवण्यासाठी पुरेसे आहे. फेडररने मागील 12 वेळा बासेल ओपनची अंतिम फेरी गाठली आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षी फेडररला एकही ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवता आले नाही. यंदा त्याने लंडनमधील विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. विम्बल्डनच्या फायनलमध्ये फेडरर नोवाक जोकोविच याचे आव्हान होते. अखेरीस स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालेल्या फायनलपैकी या फायनलमध्येजोकोविचने पाच सेटमध्ये फेडररचा पराभव केला. यंदा एकही ग्रँड स्लॅम न जिंकता फेडररचा रेकॉर्ड 47-8 वर कायम आहे आणि त्याच्यासह केवळ शाश्वत प्रतिस्पर्धी राफेल नडाल याने या विक्रमी खेळीची नोंद केली आहे. यंदा अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकत नडालने 19 वे ग्रँड स्लॅम जिंकले. आणि आता नडाल फेडररच्या फक्त 1 ग्रँड स्लॅमच्या मागे आहे. फेडररने एकूण 20 ग्रँड स्लॅम जेतेपदं पटकावली आहे.

बासेलनंतर फेडरर पॅरिस मास्टर्ससाठी हजेरी लावायची की नाही याचा निर्णय घेण्याचा बहुधा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सोमवारी आठवड्यापासून सुरू होणारी पॅरिस स्पर्धा मास्टर्स 1000 स्पर्धेतिल शेवटची स्पर्धा आहे.