IPL Auction 2025 Live

Luka Jovic Jailed for Violating COVID-19 Norms: अरे देवा! रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलर लुका जोवीकला कोरोना नियम मोडल्याबद्दल 6 महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा

जोवीकचा उल्लेख न करता फुटबॉलपटूंनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सर्बियन अधिका्यांनी टीका केली.

रिअल माद्रिदचा स्ट्रायकर लुका जोविक (Photo Credit: Instagram)

रिअल माद्रिदचा (Real Madrid) स्ट्रायकर लुका जोविक (Luka Jovic) याला देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) नियम मोडल्याबद्दल सर्बियात (Serbia) सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारी वकीलांनी शुक्रवारी दिली. जोविक मार्च महिन्यात स्पेनहून घरी परतला होत आणि बेलग्रेडच्या (Belgrade) रस्त्यावर फिरताना दिसला व 14 दिवस स्वत:ला क्वारंटाइन ठेवण्याचा आदेश देऊनही तो गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला हजार राहिला ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सरकारी वकिलांनी आता हे प्रकरण न्यायालयात नेले आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की फुटबॉलरला सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात यावी कारण त्यांनी आरोप फेटाळण्याच्या बदल्यात मानवीय हेतूंसाठी 30,000 युरो देण्यास नकार दिला. जोवीकचा उल्लेख न करता फुटबॉलपटूंनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सर्बियन अधिका्यांनी टीका केली. (Cristiano Ronaldo Coronavirus Report: क्रिस्टियानो रोनाल्डोच्या दुसऱ्या कोरोना व्हायरस चाचणीचा अहवाल पॉझिटीव्हच! बार्सिलोनाविरुद्ध सामन्याला मुकणार)

PTIमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात 22-वर्षीय जोविक याने सांगितले होते की, त्यांना क्वारंटाइन प्रक्रियेची माहिती दिली गेली नव्हती आणि तो सर्बियात आपल्या देशवासीयांना आणि आपल्या कुटुंबास आधार देण्यासाठी आला आणि स्पेन व सर्बिया या दोन्ही देशांमधील कोविड-19च्या तपासणीत तो नकारात्मक आढळला होता. दरम्यान, तो "हाय व्हायरस ट्रान्समिशन असलेल्या देशातून" आला असला तरी सर्बियन वकिलांनी न्यायालयात “रहिवासी ठिकाण सोडण्याच्या” शिक्षेबद्दल विचारणा केली आहे. त्यावेळीच्या नियमांनुसार, रिअल माद्रीद फुटबॉलरला दोन आठवडे स्वत:ला क्वारंटाइन ठेवणे आवश्यक होते.

त्यावेळी सर्बियाच्या पंतप्रधान आना ब्रॅनाबिक यांनी "परदेशातून आलेल्या फुटबॉलर्स" वर एक वाईट उदाहरण मांडल्याबद्दल टीका केली कारण बाल्कन देशाने व्हायरसविरूद्ध लढा देण्यासाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केल्यापासूनचा तो पहिलाच आठवडा होता. "ते बहु-दशलक्ष करारावर आहेत आणि ते येथे येतात आणि स्वत:ला क्वारंटाइन ठेवत नाहीत. अधिकारी याची दाखल घेतील," ब्रनाबिक म्हणाले.