Pro Kabaddi League 2019: एकतर्फी मॅचमध्ये पुणेरी पलटन संघाचा विजय, 43-33 ने गुजरात फॉर्च्यून जायंट्स पराभूत

विजयानंतर पुणेरी संघ 34 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानी पोहोचला आहे. गुजरात संघ सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. पुणेच्या डिफेन्सने आज चांगली कामगिरी बजावली.

(Photo Credit: @ProKabaddi)

पुणेरी पलटन (Puneri Paltan) संघाने प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi) आजच्या सामन्यात गुजरात फॉर्च्यून जायंट्स (Gujarat Fortunegiants) संघाला 43-33 ने पराभूत केले. पुणेसाठी नितीश तोमर याने शानदार प्रदर्शन केले. तोमरने शेवटच्या काही क्षणात सुपर रेड करत सीजनचा पहिला सुपर 10 पूर्णकेला. विजयानंतर पुणेरी संघ 34 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानी पोहोचला आहे. गुजरात संघ सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. पुणेच्या डिफेन्सने आज चांगली कामगिरी बजावली.  बाळासाहेब जाधव आणि कर्णधार सुरजित सिंह यांनी सुपर 5 पूर्ण केले आणि 5-5 गुणांची कमाई केली. शिवाय, तोमरने सर्वाधिक 11 गुण मिळवले.

पहिल्या हाफनंतर पुण्याची टीम 24-10 अशी पुढे होती आणि गुजरात संघाला बॅकफूटवर पाठविले. पहिल्या हाफमध्ये गुजरातची टीम एकदा बाद झाली आणि त्यानंतर पुणे टीमने मागे वळून पहिले नाही. पहिल्या हाल्फमध्ये पुणेच्या डिफेन्स आणि रिडींग, दोन्हीने शानदार कामगिरी बजावली आणि गुजरातला अधिक गुण मिळवण्याची फारशी संधी दिली नाही.

दुसऱ्या हाफमध्येही पुणेने चांगली सुरुवात करुन गुजरातला पुन्हा एकदा ऑल आऊट केले आणि आघाडी मजबूत केली. गुजरातसाठी सचिनने सुपर 10 सह 10 गुण मिळवून संघाला खेळात परत आणण्याचा प्रयत्न केला, पण पुनेरी पल्टनच्या अष्टपैलू कामगिरीसमोर गुजरातचा एक संघ अपयशी ठरला. सचिनशिवाय फक्त रोहित गुलिया चं प्रभावी होऊ शकला आणि त्याने सामन्यात सात गुण मिळवले. पुणेकडून, मनजितने अष्टपैलू कामगिरी करत सात गुण आणि हदी ताजिकने डिफेन्समध्ये चार गन मिळवले. पुण्याचा पुढील सामना उद्या पाटणा पायरेट्स विरुद्ध होईल तर गुजरातचा पुढील सामना उद्या दबंग दिल्लीशी होणार आहे.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif