Pro Kabaddi 2019: प्रदीप नरवाल याच्या शानदार खेळीच्या जोरावर पटना पायरेट्स ने मिळवला विजय, डिफेंसमध्ये नीरज कुमार याने केला विक्रम

पटनाकडून प्रदीप नरवालने रेडमध्ये 18 गुणांची कमाई केली तर नीरज कुमार याने डिफेन्स करत विक्रमाची नोंद केली. या विजयासह पटना पायरेट्स 35 गुणांसह 8 व्या स्थानावर आला.

पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्स (Photo Credit: @ProKabaddi)

प्रो कबड्डी लीग 2019 च्या 92 व्या सामन्यात पटना पायरेट्सने पुणेरी पल्टनला त्यांच्या घरच्या टप्प्यात 55-33 ने पराभूत केले. पटनाकडून प्रदीप नरवालने रेडमध्ये 18 गुणांची कमाई केली तर नीरज कुमार याने डिफेन्स करत विक्रमाची नोंद केली. प्रो कबड्डीच्या इतिहासातील सामन्यात 11 टॅकल पॉईंट्स घेण्याच्या मनजीत छिल्लर याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. या विजयासह पटना पायरेट्स 35 गुणांसह 8 व्या स्थानावर आला. त्याचबरोबर पुणे संघाची दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

पहिल्या हाफमध्ये मागे पडल्यानंतर पटनाने शानदार पुनरागमन केले. सामन्याच्या तिसर्‍या मिनिटाला पंकज मोहिते याने सुपर रेडने पुनेरी पल्टनला 4 गुणांची आघाडी मिळवून दिली पण पटना पायरेट्सने 2 मिनिटानंतर पॉईंट्सची बरोबरी केली. यानंतर, 10 मिनिटांतच पाटणाने पुणेला ऑल आऊट केले आणि 5 गुणांची आघाडी मिळवली. नरवालने पहिल्या हाफमध्ये शानदार प्रदर्शन करत सुपर 10 पूर्ण केला.याशिवाय नीरजने हाय फाईव्ह पूर्ण केले. पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटाला पाटणाने पुणे संघाला पुन्हा ऑलआऊट केले. अर्ध्या वेळेपर्यंत पटनाची टीम 27-17च्या गुणांसह 10 गुणांनी आघाडीवर होती. पुणेसाठी पहिल्या हाफमध्ये मोहितेने सर्वाधिक 7 गुण मिळवले. या मोसमातील पहिल्या हाफमध्ये सर्वाधिक 27 गुण मिळविणारा पटना पहिला संघ ठरला.

दुसर्‍या हाफमध्येही पटनाने आपली आघाडी कायम राखली. 31 व्या मिनिटाला पटनाने पुणेला ऑल आऊट केले आणि 14 गुणांची आघाडी मिळवली. यानंतर, 37 व्या मिनिटाला पुन्हा एकदा पाटणाने पुण्याला ऑलआऊट करत मोठा विजय निश्चित केला. या हंगामात पटनाची टीम एका सामन्यात सर्वाधिक पॉईंट, (55) बनली. पुण्याचा पुढील सामना 18 सप्टेंबरला तमिळ थालाइवास विरुद्ध होईल. तर पाटणाचा पुढील सामना 20 सप्टेंबरला तेलगू टायटन्स विरुद्ध होईल.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif