Pro Kabaddi 2019: यू मुंबा संघाला धूळ चारत हरियाणा स्टीलर्स ठरला दमदार विजेता, प्रो कबड्डी 2019 पर्वात मिळवला पाचवा विजय

मात्र, त्यांना या खेळीच्या जोरावर विजय खेचता आला नाही. हरेंद्र सिंह याने विकास खंडोला याला कोणताही गुण न मिळवता बाद केले. दरम्यान, त्यानंतर विकास खंडोला याने पुनरागमन करत सुपर रेड सोबत आपले खाते उघडले. हरियाणा संघाने सातत्याने आपली गुणसंख्या वाढती ठेवण्याची कामगिरी कायम ठेवली.

U Mumba Vs Haryana Steelers | Realme 5 Pro | (Photo Credits: prokabaddi )

Pro Kabaddi, U Mumba Vs Haryana Steelers 2019: प्रो कबड्डी लीग (PKL) 2019 च्या सातव्या पर्वातील एकोणपन्नासवा सामना आज ( सोमवार, 20 ऑगस्ट 2019) यू मुंबा (U Mumba) आणि हरियाणा स्टीलर्स ( Haryana Steelers) यांच्यात खेळला गेला. चेन्नयी येथील चेन्नई येथील जवाहरलाल नेहरु इंडोर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमहर्षक अशा या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाने यू मुंबा संघाचा 30-27 असा पराभव केला. या विजयाच्या रुपाने विकास खंडोला याने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सर्वाधिक 9 रेड गुण मिळवले.

यू मुंबा संघाची आजची खेळी चांगली ठरली. मात्र, त्यांना या खेळीच्या जोरावर विजय खेचता आला नाही. हरेंद्र सिंह याने विकास खंडोला याला कोणताही गुण न मिळवता बाद केले. दरम्यान, त्यानंतर विकास खंडोला याने पुनरागमन करत सुपर रेड सोबत आपले खाते उघडले. हरियाणा संघाने सातत्याने आपली गुणसंख्या वाढती ठेवण्याची कामगिरी कायम ठेवली. (हेही वाचा, बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना खेलरत्न तर रवींद्र जडेजा याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड)

हरियाणाने पहिल्या आर्ध्या डावापर्यंत यू मुंबा संघावर 8 गुणांनी चढाई केली. अभिषेक सिंह याने दूसऱ्या हाफमद्ये दोन सलग गुण मिळवले. या गुणांमुळे सामना फिरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. अभिषेक सिंह आणि फजल अत्राचली यांनी हरियाणा संघाला सर्वाबाद स्थानापर्यंत पोहोचवले. मात्र, शेवटच्या तीन मिनिटांमध्ये हरियाणा संघाने पुन्हा एकदा आघाडी घेत सामना खिशात घातला.



संबंधित बातम्या

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार

Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर

Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'; च्या आकडेवारीवर एक नजर