Chess World Cup 2023: बुद्धीबळ विश्वचषकावर मॅग्नस कार्लस याचे नाव, भारताचा Praggnanandhaa उपविजेता
तर त्याला तुल्यबळ लढत देताना अवघी काहीच पावले पाठिमागे राहिलेल्या भारताच्या आर Praggnanandhaa स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विश्वचषक 2023 (Chess World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या किशोरवयीन आर प्रग्नानंद (R Praggnanandhaa) याला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले आहे. प्रज्ञानंध याच्या रुपात भारताला बुद्धीबळात विश्वचषक मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अखेरच्या काहीच क्षणात ती हुकली. दरम्यान, प्रग्नानंद याची लढत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen Won Chess World Cup) याच्यासोबत झाली. ज्यामध्ये कार्लसन याने सामना जिंकत विश्वचषकावर आपले नावकोरले. स्पर्धेचा अंतिम सामना बाकू येथे 24 ऑगस्ट रोजी पार पडला.
मॅग्नस कार्लसन कार्लसन याच्यासाठी विश्वचषक स्पर्धेची ही पहिलीच वेळ असली तरी त्याच्या गाठीशी पाठिमागील अनेक वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे कोशोरवयात (वय वर्षे 18) असलेल्या प्रग्नानंद याला 32 वर्षीय कार्लसन याने अनुभवाच्या जोरावर मागे टाकले. दरम्यान, प्रज्ञानंध यानेही दिलेली लढत खास प्रशंसनीय अशी होती. त्यामुळे त्याचेही या निमित्ताने जोरदार कौतुक होते आहे.
प्रग्नानंद याने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात मोठा सामना गमावला बाब सत्य असली तरी वयाच्या 18 व्या वर्षी त्याने तरुण बुद्धीबळपटू म्हणून नाव कमावले आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. जगज्जेता होण्याच्या तो मार्गावर होता. जगज्जेता होण्याचा क्षण उवघी काहीच पावले दूर असताना अंतिम क्षणी त्याला यशाने हुलकावणी दिली.
ट्विट
बाकूमध्ये प्रग्नानंदाने मोठी फायनल गमावली असेल, परंतु चेन्नईच्या 18 वर्षीय तरुणाने भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव कोरले आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला होता आणि भारतीय दिग्गज खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर सामील होण्यापासून तो विजय दूर होता.