Cristiano Ronaldo Buys Bugatti Centodieci: अबब! क्रिस्टियानो रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी गाडी, किंमत जाणून पाहून तुम्हालाही घाम फुटेल
त्याने एक अत्यंत दुर्मिळ कार बुगाटी ला व्होवर नायर विकत घेतली ज्याची किंमत जाणून तुमचाही घाम फुटेल. या गाडीची किंमत अंदाजे 75 कोटी रुपये (8.5 मिलियन युरो) आहेत.
एमएस धोनीचं बाईक प्रेम तसंच पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) गाडी प्रेम सर्वश्रुत आहेत. आणि रोनाल्डोच्या आपल्या गाड्यांच्या संग्रहालयात जगातील सर्वात महागड्या गाडीची भर पडली आहे. पोर्तुगाल (Portugal) आणि जुव्हेंटसचा (Juventus) स्टार फॉरवर्ड रोनाल्डो जगातील सर्वात महागड्या ऑटोमोबाईलचा मालक बनला आहे. त्याने एक अत्यंत दुर्मिळ कार बुगाटी ला व्होवर नायर (Bugatti La Voiture Noire) विकत घेतली ज्याची किंमत जाणून तुमचाही घाम फुटेल. या गाडीची किंमत अंदाजे 75 कोटी रुपये (8.5 मिलियन युरो) आहेत. या गाडीसोबत 35 वर्षीय रोनाल्डोने स्वतःचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. बुगाटीच्या प्रीमियर ऑटोमोबाईलच्या आतापर्यंत केवळ 10 युनिट्स तयार केल्यामुळे ही कार खासगी म्हणून ओळखली जात आहे. रोनाल्डोची गाडी कॅस्टमाइज्ड केली गेली आहे, कारण यावरील CR7 इतर कोणीही सहजपणे शोधू शकतात. 'बुगाटी'चा वेग ताशी 380 किमी म्हणजेच एकादी व्यक्ती 2.4 सेकंदात 60 किमीपर्यंत पोहोचू शकते. दरम्यान, रोनाल्डोकडे आधीपासूनच फेरारी 599 जीटीओ, लॅम्बोर्गिनी अवेन्टॉडोर आणि मॅकलरेन एमपी4 12 सी आहे आणि त्याने गेल्या वर्षी जूनमध्ये 5.5 मिलियन पौंडची लक्झरी नौका देखील खरेदी केले होते. (क्रिस्टियानो रोनाल्डोने नोंदवला हंगामातील 30 वा गोल, Serie A 2019-20 मध्ये एसी मिलानविरुद्द जुवेंटसचा 2-4 ने पराभव)
जगातील सर्वात महागड्या कारचे मालक रोनाल्डोच्या गॅरेजमधील सर्व कारची एकूण किंमत 30 लाख युरो (264 कोटींपेक्षा जास्त) आहे.रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी कार खरेदी करण्याने आश्चर्य वाटलं नाही, कारण विशेषत: बुगाटीच्या फुटबॉल स्टारशी असलेल्या नात्यामुळे, नुकतीच, बुगाटी आणि नाईक एकत्र येऊन रोनाल्डोसाठी घोट्याचे खास बूट सादर केले. रोनाल्डो लक्झरी कारची प्रशंसा करतो आणि त्याच्या गॅरेजमध्ये बर्याच सुपर कार आहेत. त्याच्याकडे आधीपासूनच बुगाटी वेरॉन ग्रँड स्पोर्ट व्हिटेस आहे. रोनाल्डो अनेकदा आपल्या 233 लाख फॉलोअर्ससाठी आपल्या मोटारींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
तत्पूर्वी, रोनाल्डोने नुकताच जुव्हेंटससह सेरी ए विजेतेपद मिळविले. 2019-20 हंगामातील तो सर्वोच्च क्रमांकाचा गोल करणारा खेळाडू होता. आठवड्याच्या अखेरीस रोनाल्डो चॅम्पियन्स लीगमध्ये पुन्हा प्रवेश करणार करेल आणि स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याकडे जुव्हेंटसचे लक्ष्य असेल.