Pro Kabaddi 2019: एकतर्फी सामन्यात जयपुर पिंक पैंथर्सचा विजय, पुणेरी पलटणचा पाचवा पराभव

या मॅचमध्ये जयपूरच्या संघाने 33-25 च्या अंतराने समान जिंकला. दीपक हुड्डाच्या दमदार खेळीच्या जोरावर जयपूरने पुणे संघावर विजय मिळवला. दोन्ही संघाने दमदार पाने सुरुवात केली होती. पण, जयपूरच्या संघाने कमालीचे प्रदर्शन केला आणि सामना जिंकला.

दीपक हुड्डा (Photo Credit: @ProKabaddi/Twitter)

प्रो कबड्डी सीजन 7 च्या आज, 15 ऑगस्टच्या सामन्यात जयपुर पिंक पैंथर (Jaipur Pink Panther) आणि पुणेरी पलटण (Puneri Paltan) यांच्यात मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये जयपूरच्या संघाने 33-25 च्या अंतराने समान जिंकला. आजचा सामना अहमदाबादच्या ट्रांसस्टेडियाच्या एका एरिनामध्ये खेळवला गेला. दीपक हुड्डा (Deepak Hooda) याच्या दमदार खेळीच्या जोरावर जयपूरने पुणे संघावर विजय मिळवला. दोन्ही संघाने दमदार पाने सुरुवात केली होती. पण, जयपूरच्या संघाने कमालीचे प्रदर्शन केला आणि सामना जिंकला. या विजयासह जयपूर संघाने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे, पुणे संघ गुणतालिकेत 7 पैकी 2 सामने जिंकत आणि 5 गमावत शेवटच्या स्थानी पोहचली आहे. जयपूरने 6 सामन्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. जयपूर आणि पुणे संघातील सामना रंगतदार होईल असे वाटले होते, कारण दिनही संघाने त्यांचा मागील सामना गमावला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवत विजय निश्चित करण्याच्या निर्धारित होती.

या सामन्यातील पहिल्या हाल्फनंतर जयपूर पिंक पँथर्सने पुनेरी पलटणवर 17-11 अशी आघाडी घेतली. सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा होती, पण जयपूरच्या रायडर्सने पुण्याच्या बचावपटूंवर दबाव आणला आणि गुण मिळवले. पहिल्या उत्तरार्धात पुणेच्या डिफेंडर्सने निराशा केली. त्यांनी फक्त एक गुण मिळविला. पहिल्या हाल्फमध्ये जयपूरचा कर्णधार दीपक पुन्हा एकदा फॉर्ममध्ये दिसला. दुसर्‍या हाफमध्येही जयपूर पिंक पँथर्सने आपले वर्चस्व कायम राखले आणि पुनेरी पलटनवर दबाव कायम ठेवला. पुनने सुपर टॅकलसह पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण जयपूरने 29 व्या मिनिटाला सामन्यात दुसऱ्यांदा आघाडी घेण्यासाठी पुण्याला आव्हान दिले. अखेरीस, जयपूरने सामना सहज जिंकला आणि पुणेरी पलटणची निराशाजनक कामगिरी अजूनही सुरूच राहिली.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif