Paris Games Breaking Google Doodle Today: पॅरिस गेम्समधील ब्रेकिंग, प्रसारमाध्यमांतील ऑलिम्पिक वार्तांकनावर खास गूगल डूडल
आजही पॅरिस गेम्समधील ब्रेकिंग (Paris Games Breaking Google Doodle Today) यावर आधारीत गुगल डूडल पाहायला मिळते.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) ही जगभरातील सर्वोच्च मानली जाणारी क्रीडा स्पर्धा आता मध्यावर येऊन ठेपली आहे. जगभरातील विविध देशांचे खेळाडून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात आपापले कसब दाखवत आहे. एकूणच क्रीडाविश्वात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, या उत्साहात सर्च इंजिन गूगल हे देखील सहभागी आहे. त्यामुळे स्पर्धा सुरु झाल्यापासून आजचे डूडल काय? याबाबत सर्वांना उत्सुकता असते.
पॅरिस गेम्स गूगल डूडल खास आकर्षण
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा सुरु झाल्यापासून गूगलने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर डूडल साकारले आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिक स्पोर्ट क्लाइम्बिंग, आर्टिस्टिक स्विमींग, रिंग जिन्मास्टिक, सेलिंग ऑलिम्पिक, सर्फिंग ऑलिम्पिंक, जिम्नॅस्टिक, पॅरिस फुटबॉल ऑलिम्पिक यांसह इतरही अनेक विषयांवर गूगल डूडल साकारण्यात आले आहे. (हेही वाचा, Olympics Sport Climbing Google Doodle: ओलंपिक स्पोर्ट क्लाइम्बिंग गूगल डूडल; गिर्यारोहण करणारा गिर्यारोहक पाहिलात का?)
'ब्रेकींग न्यूज'ला प्राधान्य
आजच्या गूगल डूडलमध्येही ऑलिम्पिकलाच प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, या प्राधान्यामध्ये प्रथमच 'ब्रेकींग न्यूज'ला प्राधान्य देण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेचे प्रसारमाध्यमांतून होणारे वार्तांकन हा एक महत्त्वाचा घटक. ज्यामुळे जगभरातील नागरिकांना या स्पर्धाचा आनंद घेता येतो. तसेच, क्रीडा प्रेमिंनाही या स्पर्धेशी जोडून घेता येते. सर्वांनाच या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष पॅरिसमध्ये जाता येत नाही. त्यामुळे अशा इच्छूक परंतू प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या मंडळींसाठी प्रसारमाध्यमं जणू क्रीडा दूतच ठरतात. अशा वेळी माध्यमांची दखल घेणे उचितच ठरते. जे गूगलनेही केले आणि आपल्या मुखपृष्ठावर खास डूडूल साकारले. (हेही वाचा, Breaking Olympics Google Doodle: ऑलिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये पहिल्यांदाच खेळल्या जाणार्या 'ब्रेकिंग ऑलिंपिक' साठी खास गूगल डूडल)
आजच्या गूगल डूडलमध्ये पाहायाल मिळते की, काही पक्षी मोठ्या आनंदाने नाचत आहेत. जणू ते ऑलिम्पिकचा उत्साहच साजरा करत आहेत. संकल्पना आहे की, घराचा हॉल आहे. ज्यामध्ये टीव्ही आहे. अर्थात डूडलमध्ये टीव्ही पाहायला मिळत नाही. पण, एकूण रचना पाहिली की तो असावा हे पटकण लक्षात येते. बहुदा कोणीतरी पदक जिंकले आहे आणि त्या आनंदात हे पक्षी नाचत आहेत. एक छोटा पक्षी घरातील सोफ्यावर चडून नाचत आहे तर दुसरा सोफ्यासमोर असलेल्या कार्पेटवर. बाकीचे इतरही छोटेमोठे पक्षीही जागा मिळेल तिथे नाचत आहेत. बहुदा अवघं घरच रंगलंय ऑलिम्पिकच्या आनंदात, असेच वातावरण पाहायला मिळते आहे. बाकी घराच्या भिंतीवरही ऑलिम्पीकचा उत्साह चित्रित झालेला पाहायाल मिळते. विशेष म्हणजे या वेळी ऑलिम्पीक सुरु झाल्यापासून गूगल डूडल साकारत आहे. विशेष अॅनिमेटेड डूडलमध्ये पक्षी महत्त्वाची जबाबदारी भूषवताना पाहायला मिळतात.