Tokyo Paralympics 2020: अपंगत्व आणि समस्यांवर मात करून जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार पॅरालम्पियन, भारताच्या पदकांच्या दावेदारांबाबत घ्या जाणून

टोकियो पॅरालिम्पिक खेळांसाठी भारत आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवत आहे. यंदा 54 सदस्यीय भारतीय तुकडी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या अन्य खेळाडूंप्रमाणेच भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरतील.

पॅरालिम्पिक 2020 भारतीय दल (Photo Credit: PTI)

Paralympics 2020 India medal Hopes: टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) अफाट यशानंतर आता पॅरा खेळाडूंना मैदानात आपला तग धरण्याची वेळ आली आहे. टोकियो पॅरालिम्पिक खेळांसाठी (Paralympic Games) भारत आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवत आहे, ज्यामध्ये 54 खेळाडू नऊ विषयांमध्ये भाग घेणार आहेत. भारताने 1968 मध्ये पहिल्यांदा पॅरालिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला होता. टोकियो येथे 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये 136 देशांतील सुमारे 4,400 पॅरा अॅथलीट (Para-Athletes) 22 खेळांमधील 540 स्पर्धांमध्ये पदकांसाठी आव्हान देतील. भारताने आतापर्यंत पॅरालिम्पिक खेळात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 12 पदके जिंकली आहेत. आणि यंदा 54 सदस्यीय भारतीय तुकडी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या अन्य खेळाडूंप्रमाणेच भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरतील. (Tokyo Olympics 2020 Medal Tally Updated: भारत पदक तालिकेत 48 व्या स्थानावर, चीनला पछाडत अमेरिका नंबर-1)

देवेंद्र झाझरिया - भालाफेक

देवेंद्र हा भारताचा सर्वात यशस्वी पॅरालिम्पियन खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत दोन सुवर्ण पदके भालाफेक स्पर्धेत आपल्या नावावर केली आहेत. त्याने 2020 टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी जुलै 2021 मध्ये 65.71 मीटर अंतर लांब भाला फेकला.

सुहास यतीराज - पॅरा बॅडमिंटन

पॅरा शटलर सुहास एल. यथिराजला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 मध्ये कोटा देण्यात आला आहे. नोएडा DM ने 2018 आशियाई पॅरा गेम्स कांस्यपदक विजेता आणि 2016 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेतेपद जिंकले आहे.

मरिअप्पन थंगावेलू - हाय जंप

मरिअप्पन थंगावेलूने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या T42 उंच उडी घेत सुवर्णपदक पटकावले होते. 2019 जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक देखील जिंकले.

मनीष नरवाल - पॅरा शूटिंग

मनीष नरवाल पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा नेमबाज आहे. नरवालने यंदा वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात भारताचे दुसरे पॅरा-नेमबाजी विश्वचषक सुवर्णपदकावर नाव कोरले होते.

एकता ध्यान - डिस्कस थ्रो

महिला क्लब थ्रोमध्ये 16.02 मीटर रेकॉर्ड थ्रोसह एकता ध्यान ही भारताची अव्वल डिस्कस थ्रो पॅरा अॅथलीट आहे. जरी तिने हा खेळ फक्त 5 वर्षांपूर्वी खेळण्यास सुरुवात केली असली तरी एकताने भरपूर राष्ट्रीय पदके पटकावली आहेत.