India vs Oman, 2022 FIFA World Cup Qualifiers Result: ओमान विजयी, 1-0 फरकाने भारतीय फुटबॉल संघ पराभूत, India फीफा विश्वचषक 2022 स्पर्धेतून बाहेर
ओमानने भारताचा 1-0 ने पराभव केला
India vs Oman, 2022 FIFA World Cup Qualifiers Result: फीफा विश्वचषक जिंकण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे स्वप्न आज भंगले. ओमान आणि भारत यांच्यात झालेल्या उत्कंटावर्धक सामना झाला. मात्र, या सामन्यात ओमान फुटबॉल संघाने भारताच्या सुनील छेत्री आणि संघाला पराभूत केले. त्यामुळे यंदाही भारताचे फुटबॉल वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न धुळीला मिळाले. हा सामना जिंकला असता तर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताची दावेदारी कायम राहिली असती. मात्र, असे घडने बहुदा नियतीच्या मनात नव्हते.
ओमान संघासोबत झालेल्या लढतीत झालेल्या पराभवामुळे भारत 2022 मध्ये होणाऱ्या फीफा फुटबॉल वर्ल्ड कप क्वॉलीफाई स्पर्धेतून बाहेर पडला. फीफा फुटबॉल वर्डकप स्पर्धेत आपली दावेदारी कायम ठेवणाऱ्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारत आणि ओमान एकमेकांना जोरदार भीडले मात्र ओमानचे पारडे जड ठरले. ओमानने भारताचा 1-0 ने पराभव केला. (हेही वाचा, IND vs Oman, FIFA World Cup 2022 Qualifiers Live Streaming: भारत विरुद्ध ओमान फिफा विश्वचषक 2022 क्वालिफायर सामना आपण Star Sports नेटवर्कवर पाहू शकता लाईव्ह)
टीम इंडियासाठी आजचा सामना करो या मरो असा होता. मात्र, सर्वस्व पणाला लाऊनही भारताला अंतिम यश मिळाले नाही. फीफा रँकिंग्ज मध्ये ओमान 84 व्या तर भारत 106 व्या क्रमांकावर आहे. भारत आणि ओमान हे दोन्ही संघ ई गटात आहेत. या दोन्ही संघात दुसऱ्यांदा टक्कर झाली. पहिला सामना 5 सप्टेंबर गुवाहाटी येथे पहिल्यांदा सामना झाला होता. त्याही वेळा ओमान संघाने भारतीय संघाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. त्या वेळी भारताच्या सुनील छेत्रीने 24 व्या मिनिटाला गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली होती.