Swapnil Kusale: नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे वडील नाराज, राज्य सरकारबद्दल व्यक्त केली खंत

ही नाराजी खेळ आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतील असमानतेवरुन आहे.

Swapnil Kusale: नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे वडील नाराज, राज्य सरकारबद्दल व्यक्त केली खंत
Swapnil Kusale (Photo Credit - X)

Olympic 2024: नेमबाज आणि ऑलिम्पीक पदक विजेता (Olympic Medal) स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याच्या वडिलांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी खेळ आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतील असमानतेवरुन आहे. त्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने बक्षीस म्हणून आपल्या मुलाला जाहीर केलेली रक्कम द्यायला विलंब लावला. केवळ विलंबच लावला नाही तर त्यांनी ती रक्कमही कामगिरीच्या मानाने अत्यल्प दिली आहे. क्रिकेटमध्ये विजय मिळवणाऱ्या खेळाडूंना दिले जाणारे बक्षीस तत्काळ जाहीर होते आणि त्याच तत्काळतेने दिले जाते. शिवाय ती रक्कमही मोठ्या प्रमाणावर असते, अशी खंतही ते व्यक्त करतात.

सुरेश कुसाळे यांची नाराजी का?

राज्य सरकारने स्वप्नील कुसाळे याला जाहीर केलेली बक्षिस रक्कम देण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी घेतला. मात्र, क्रिकेटमध्ये जिंकलेल्या खेळाडूंना जाहीर केलेली रक्कम अवघ्या काही तासांमध्येच आदा करण्यात आली, अशी नाराजी नेमबाजाचे वडील व्यक्त करतात. स्वप्नील कुसाळे आणि मनू भाकर यांनी पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदकविजेती कामगिरी केली. स्वप्नील यास कांस्यपदक मिळाले. त्याचा आनंद म्हणून कोल्हापूरकरांनी त्याचे जंगी स्वागत केले. लागलीच राज्य सरकारनेही त्याला चागले बक्षीस जाहीर केले. दरम्यान, बक्षीसाची रक्कम देण्यास विलंब लावल्याने त्याच्या वडीलांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकार इतकं उदासीन का? ते जर इतकं उदासीन आहे हे माहिती असतं तर मुलाला क्रीडाक्षेत्रात पाठवलंच नसतं, असाउद्वेगही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Swapnil Kusale Wins Bronze: पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले)

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर अवघ्या पाच दिवसांमध्येच राज्य सरकारने या संघाला तब्बल 11 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याच लगबगीने ते अदाही केले. पण, ऑलिंपीक विजेत्यांना मात्र मुळातच बक्षिस म्हणून जाहीर केलेली रक्कम अतिशय कमी होती. विशेष म्हणजे स्वप्नीलच्या रुपात केवळ एकच ऑलिंम्पीक पदक राज्याला मिळाले होते. त्या उलट राज्याने बक्षीस म्हणून सुवर्णपदकास 5 कोटी, रौप्यपदकास 3 कोटी, आणि कांस्यपदकास 2 कोटी जाहीर केले. यात विनोद असा की, राज्य सरकारने मूळात ही रक्कम पात्र खेळाडूस द्यायला जवळपास दोन महिने लावले. धक्कादायक असे की, ऑलिम्पीक सूवर्ण आणि रौप्य पदक विजेता खेळाडूच या वेळी राज्यात नव्हता. तर सरकारने ही रक्कम आणि बक्षीस कोणासाठी जाहीर केले? हा प्रश्न अद्यापही राज्याला सुटला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif