Men's Hockey World Cup 2023: ओडिशात होणार पुरुष हॉकी विश्वचषक, भुवनेश्वर आणि राउरकेलामध्ये होणार सामने
भारत सलग सलग दुसर्यांदा या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पुरुष हॉकी विश्वचषक 13 ते 29 जानेवारी दरम्यान भारतात खेळला जाईल.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी येथे सांगितले की, पुरुष हॉकी विश्वचषक (Men's Hockey World Cup) 2023 चे सामने भुवनेश्वर (Bhubaneswar) आणि राउलकेलामध्ये होणार आहे. या महिन्याच्या 8 तारखेला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) 2023 पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताची निवड केली. भारत सलग सलग दुसर्यांदा या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पुरुष हॉकी विश्वचषक 13 ते 29 जानेवारी दरम्यान भारतात खेळला जाईल. ओडिशाने यापूर्वी 2018 मध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी, राजधानी भुवनेश्वरमधील कलिंग स्टेडियमवर या विश्वचषकचे सामने खेळले गेले होते. “आम्ही 2018 च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते आणि मी हे जाहीर करू इच्छितो की 2023 हॉकी विश्वचषक पुन्हा भुवनेश्वर आणि राउरकेला येथे होईल,” पटनाईक यांनी कलिंग स्टेडियमवर एका संक्षिप्त कार्यक्रमात बोलताना सांगितले. "आपण आनंदी आहात का? मी आनंदी आहे," पटनाईक म्हणाले. (भारतात होणार 2023 पुरुष हॉकी वर्ल्ड कप, स्पेन-नेदरलँड्स सोबत आयोजित करणार 2022 महिला विश्वचषक)
पुरुष विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तीन देशांनी दावेदारी दर्शवली होती. भारतव्यतिरिक्त मलेशिया आणि बेल्जियम या देशांचा देखील यात समावेश होता.दुसरीकडे, स्पेन आणि नेदरलँड्स महिला हॉकी विश्वचषक आयोजित करतील. हा विश्वचषक 2022 मध्ये 1 ते 17 जुलै दरम्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने सांगितले होते की हॉकी विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळल्या जाणार्या सर्व सामन्यांचे स्थान यजमान देशांनी ठरवावे. त्याअंतर्गत, भारताने 2023 मध्ये होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची ठिकाणे जाहीर केली आहेत.
अलिकडच्या काळात, भुवनेश्वरने 2014 मधील एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, 2016 मधील कनिष्ठ पुरुष विश्वचषक, 2017 मधील एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग फायनल, 2019 मधील एफआयएच पुरुष मालिका फायनल आणि अलीकडील एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता समारोप यासह काही मोठ्या हॉकी स्पर्धांचे भारतात आयोजन करण्यात आले आहेत. शिवाय, फिफा महिला अंडर -17 विश्वचषक सामन्यांसाठी 2020 ओडिशाच्या या राजधानी निवडण्यात आली आहे.