Milkha Singh Passes Away: जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे COVID-19 संसर्गामुळे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांना साधारण एक महिन्यापूर्वी कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. 91 वर्षीय मिल्का सिंह यांनी जवळपास एक महिना कोविड विषाणूविरोद्ध झुंज दिली. मात्र, शुक्रवारी रात्री ही झुंज अयशस्वी ठरली.

‘फ्लाइंग शीख’ मिल्खा सिंह (Photo Credit: ANI)

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन (Milkha Singh Passes Away) झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. कोविड 19 विषाणू (COVID-19) संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच शुक्रवारी (18 जून) रात्री 11.30 वाजणेच्या सुमारास चंडीगढ येथे त्यांचे निधन झाले. मिल्खा सिंह (Milkha Singh) यांच्या पत्नी निर्मला कौर यांनाही कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला होता. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचेही त्यांचेही रविवारी (13 जूून) निधन झाले होते. निर्मला कौर यासुद्धा क्रीडापटू होत्या. त्या भारतीय वॉलीबॉल संघाच्या माजी कप्तान राहिल्या आहेत. मिल्खा सिंह आणि निर्मला कौर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मिल्खा सिंह यांच्या कुटुंबाशी संबंधीत एका व्यक्तीने सांगितले की, मिल्खा सिंह यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले. त्यांना साधारण एक महिन्यापूर्वी कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. 91 वर्षीय मिल्का सिंह यांनी जवळपास एक महिना कोविड विषाणूविरोद्ध झुंज दिली. मात्र, शुक्रवारी रात्री ही झुंज अयशस्वी ठरली. त्यांचे निधन झाले. चंडिगढ येथील पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 20 मे 2021 या दिवशि कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पहिल्यांदा निष्पन्न झाले. त्या आधी सिंह यांच्या कुटुंबातील स्वयंपाक्याला कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यानतर मिल्खा सिंह आणि त्यांच्या पत्नी निर्मला कौर यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर मिल्खा सिंह यांना 24 मे रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार झाल्यावर रुग्णालयाने त्यांना 30 मे पासून सुट्टी दिली होती. त्यानंतर 03 जून या दिवशी पुन्हा त्यांच्या शरीराती ऑक्सिजनची पातळी कमी झाली. त्यामुळे त्यांना पीजीआयएमईआर च्या नेहरु अक्सटेंशनमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. परंतू, शिक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खूपच खालावली. अंगात ताप वाढला होता आणि ऑक्सिजनची पातळीही बऱ्याच प्रमाणात घटली होती. खालावत गेलेली प्रकृती नंतर सावरलीच नाही. मिल्खा सिंह यांचे निधन झाले. मिल्का सिंह यांच्या पश्चात मुलगा गोल्फर जीव मिल्खा सिंह आणि तिन मुली आहेत. (हेही वाचा, Milkha Singh Health Update: मिल्खा सिंह यांची प्रकृती खालावली, चंदीगडमध्ये डॉक्टरांची टीम करत आहे देखरेख)

पंतप्रधान मोदी ट्विट

मिल्खा सिंह यांनी आपल्या कारकीर्दीत एशियाई खेळांमध्ये सूवर्ण पदक विजेती कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games) स्पर्धा 1858 मध्ये चॅम्पीयन आणि 1960 च्या ऑलिम्पीक स्पर्धेत मिल्का सिंह यांनी पदक विजेती कामगिरी केली होती. 1960 मध्ये इजिप्त येथे पार पडलेल्या ऑलिम्पीक स्पर्धेत त्यांनी आपल्या क्रिडा आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी केली होती. या स्पर्धेत ते 400 मिटर फायनलमध्ये चौथ्या स्थानावर होते. त्यांनी 1956 आणि 1964 ऑलिम्पीकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 1959 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.