Khabib Nurmagomedov Comeback: Khabib Nurmagomedov याने यूएफसी 254 च्या मुख्य स्पर्धेत निवृत्तीची घोषणा केली जिथे त्याने जस्टीन गेथजेविरुद्ध (Justin Gaethje) विजय मिळवून निर्विवाद हलके वजनाच्या चॅम्पियनशिप (LightWeight Championship) कायम ठेवलं. दुसर्या फेरीत मोठ्या प्रमाणावर सबमिशन जिंकल्यानंतर 'द ईगल' ने म्हटले की त्याचे वडील अब्दुलमानप यांच्याशिवाय यूएफसीमध्ये (UFC) पुढे न खेळण्याचा त्याने निर्णय घेतला आहे. जून महिन्यात कोरोना व्हायरसमुळे खबीबच्या वडिलांचा मृत्यू झाला. खबीबच्या निवृत्तीच्या बातमीने संपूर्ण एमएमए (MMA) जगाला धक्का बसला कारण तो एक महान फायटर आहे आणि त्याने चाहत्यांना बरेच चांगले संसमरणीय सामने दिले आहेत. दरम्यान, एका अहवालानुसार युएफसी अध्यक्ष डाना व्हाईट (Dana White) लवकरच खबीबची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यूएफसी 254 मध्ये जस्टिन गेथजेविरुद्ध फाईट त्याची फाईट अंतिम असेल असे खबीबने सांगितले. (Khabib Nurmagomedov ने पुनरागमन करत कॉनोर मॅकग्रेगोरचा पुन्हा एकदा सामना करावा, अमेरिकेचे माजी UFC चॅम्पियन डेनिअल कोरमिअर यांनी व्यक्त केली इच्छा)
दरम्यान, खबीबने पुढे फाईट करणार नसल्याबद्दल स्पष्ट केले आहे. एमएमएच्या रिपोर्टर अॅरोन ब्रॉन्स्टेटरच्या म्हणण्यानुसार, डाना व्हाईट लवकरच खबीबला भेटतील आणि त्याच्या एमएमए मधील त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करतील. लाइटवेट विभागात आपण नुकतंच पाहिलं की खबीबचा बालपण मित्र Islam Makhachev दुखापतीमुळे राफेल डोस अँजोसविरूद्ध यूएफसी वेगास 14 मुख्य स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. युएफसी वेगास 14 मधील मुख्य स्पर्धेत आरडीएने पॉल फेडरचा पराभव केला. खबीबने पुनरागमन केल्यास तो आपला करियर 30-0 पर्यंत वाढवू शकतो. त्याउलट, जर ईगल आपल्या निर्णयावर कायम राहिला तर लाइटवेटच्या विभागात विजेतेपदाशिवाय राहिलं.
Dana White says that he will be meeting with Khabib Nurmagomedov sometime soon.
— Aaron Bronsteter (@aaronbronsteter) November 22, 2020
आतापर्यंत 155 पौंड विभागातील चार दावेदार आगामी सामन्यांमध्ये दाखल झाले आहेत. Dustin Poirier याचा सामना जानेवारी महिन्यात यूएफसी 257 येथे कॉर्नर मॅकग्रीगरशी होणार आहे, तर तर टोनी फर्ग्युसनची डिसेंबर महिन्यात यूएफसी 256 मध्ये चार्ल्स ऑलिव्हिराची लढत होईल. अशा स्थितीत खबीब आपल्या लाइटवेट टायटलचा डिफेन्ससाठी परत येईल की नाही हे फक्त वेळच सांगेल. खबीबने आपले उर्वरित आयुष्य आई आणि कुटुंबासमवेत शांततेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. खाबीब मुस्लिम असल्याने आता तो प्रार्थना आणि उपासनेसाठी अधिक वेळ देईल.