Khabib Nurmagomedov Retirement: प्रख्यात UFC LightWeight फायटर खबीब नूरमागोमेदोव ने केली सेवानिवृत्तीची घोषणा, आईला दिलेल्या वचनाचे केले पालन

त्याच सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत त्याने 29 फाइट केल्या पण त्यातील एकही फाइट तो हरला नाही. त्यामुळे 29-0 असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. UFC लाइटवेट चॅम्पियनशीप मध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Khabib Nurmagomedov Retirement (Photo Credits: Facebook)

Khabib Nurmagomedov Retirement: जगप्रसिद्ध रुसी फायटर खबीब नूरमागोमेदोव (Khabib Nurmagomedov) फायटिंग जगतामधून निरोप घेतला आहे. मार्शल आर्टच्या दुनियेतील एक असे नाव ज्यांनी मार्शल आर्टचा (Martial Art) चेहरा मोहरा बदलून टाकला. त्याने काल झालेल्या आपल्या शेवटच्या फायटिंग सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या आईला वचन दिले होते की कालची फाइट मॅच ही त्याची शेवटची फाइट असेल. आईला दिलेल्या वचनाचे त्याने पालन केले. काल Justin Gaethje झालेल्या सामन्यात खबीबच्या पायाला गंभीर दुखापत झाली असताना त्याने जस्टिनला हरवले.

खबीब साठी ही फाइट खूपच महत्त्वाची होती. त्याच सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत त्याने 29 फाइट केल्या पण त्यातील एकही फाइट तो हरला नाही. त्यामुळे 29-0 असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. UFC लाइटवेट चॅम्पियनशीप मध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. MS Dhoni Announces Retirement from International Cricket: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

खबीबर MMA च्या इतिहासातील सर्वात मोठा आणि खतरनाक फायटर म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत खेळलेली एकही फाइट तो हरला नाही हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या समोर ज्या ज्या दिग्गज खेळाडूंनी पाऊल ठेवले त्या सर्वांना त्याने चांगलीच धूळ चारली आहे. त्यातच मार्शल आर्ट मधील मोठे नाव कॉनरला यांना हरवून खबीबने हे सिद्ध केले की त्यांच्यासारखा फाइटर MMA मध्ये दुसरा कोणीही नाही.

खबीबच्या निवृत्तीची बातमी ऐकताच त्याच्या जगभरातील चाहत्यांना धक्काच बसला. त्यांच्यासाठी हा धक्का न पचण्यासारखा आहे. UFC लाइटवेट फायटिंग मधील स्वत:च्या जबरदस्त कामगिरीमुळे खबीबने नाव कमावले होते. स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यात एकाएकी त्याच्या निवृत्तीची घोषणा ऐकून चाहतेही गोंधळले आहेत.