ISL 2020-21 Final: Mumbai City FC पहिल्यांदा बनला चॅम्पियन, फायनलमध्ये ATK Mohun Bagan FC वर केली मात

शनिवारी फातोर्दा च्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन सुपर लीगच्या यंदाच्या हंगामात हॅटट्रिक घेणाऱ्या बिपीन सिंहद्वारे 90व्या मिनिटाला केलेल्या विजयी गोलच्या जोरावर सातव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई सिटी एफसी संघाने गतविजेत्या मोहुन बागानचा 2-1 असा पराभव केला. यासह मुंबई संघाने पहिल्यांदा आयएसएल चॅम्पियन होण्याचे मान मिळवला.

मुंबई सिटी एफसी (Photo Credit: Twitter/MumbaiCityFC)

ISL 2020-21 Final: शनिवारी फातोर्दा च्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन सुपर लीगच्या (Indian Super League) यंदाच्या हंगामात हॅटट्रिक घेणाऱ्या बिपीन सिंहद्वारे (Bipin Singh) 90व्या मिनिटाला केलेल्या विजयी गोलच्या जोरावर सातव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) संघाने गतविजेत्या एटीके मोहन बागान एफसीचा (ATK Mohun Bagan FC) 2-1 असा पराभव केला. यासह मुंबई संघाने पहिल्यांदा आयएसएल चॅम्पियन होण्याचे मान मिळवला. एटीके मोहून बागानकडून 18व्या मिनिटाला डेविड विल्यम्सने गोल केला, तर मुंबई सिटी एफसीचा पहिला गोल टिरीने 29 व्या मिनिटाला आत्मघातकी गोल म्हणून केला. अखेर, बिपिनने 90व्या मिनिटाला संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्यास गोल केला. या पराभवामुळे एटीके मोहनन बागान संघाचे यंदा आयएसएलचे (ISL) विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

दोन्ही संघांमधील पहिला हाफ 1-1 ने संपुष्टात आला. विल्यम्सने सलग तिसर्‍या सामन्यात 18व्या मिनिटात गोल करत ATKMB संघाला आघाडी मिळवून दिली. संघासाठी सर्व काही व्यवस्थित चालू होते, परंतु 29व्या मिनिटाला टिरीने आत्मघाती गोल करत मुंबईला आनंदी होण्याचे कारण दिले. यंदाच्या मोसमात मुंबईच्या संघाने अर्ध्या भागावर 68 टक्के बॉल ताब्यात राखले, परंतु असे असूनही त्यांना गोल करता आले नाही. दोन्ही संघाने दोन-दोन फटके टार्गेटवर लागले, पण सर्व प्रयत्न करूनही दोन्ही संघांना एकाही कॉर्नर मिळवता आला नाही. 11व्या मिनिटाला बिपीन सिंहला प्रीतम कोटलने पेनल्टी एरियामध्ये पाडल्याने मुंबईने पेनल्टीची मागणी केली पण रेफरीने त्याला नकार दिला. 29 व्या मिनिटाच्या टीरी ऑनगोलमुळे मुंबई सिटी एफसीने सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली, ज्यानंतर दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या प्रयतात दिसेल, पण यश मिळू शकले नाही.

तथापि, शेवटच्या क्षणी, बिपिनने मुंबई  सिटीसाठी एक शानदार गोल करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर काही वेळानंतर रेफरीने अंतिम शिटी वाजवल्यावर मुंबई सिटी एफसीचे सर्व खेळाडू आणि कर्मचारी आनंदाने उड्या मारू लागले व आयएसएलमध्ये 2-1 विजयाने पहिल्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now