India's No. 1 Chess Player: जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत 21 वर्षीय Arjun Erigaisi ने विश्वनाथन आनंदला मागे टाकले; बनला भारताचा नवा नंबर 1 बुद्धिबळपटू
त्याचे रेटिंग 2830 आहे. त्याच्यानंतर अमेरिकेचा फॅबियानो कारुआना 2803 गुणांसह दुस-या स्थानावर तर हिकारू नाकामुरा 2789 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
India's no 1 Chess Player: भारतातील बुद्धिबळ (Chess) जगतातून एक नवीन आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने एप्रिल महिन्यासाठी नव्या क्रमवारीची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 21 वर्षीय भारतीय मुलगा अनुभवी भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंदला पराभूत करून देशाचा नवा नंबर 1 बुद्धिबळपटू बनला आहे. अर्जुन एरिगासी (Arjun Erigaisi) असे या मुलाचे नाव आहे. अर्जुन एरिगासीने सोमवारी अधिकृत FIDE रेटिंग यादीत पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदची जागा घेतली.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या एप्रिल महिन्याच्या जागतिक क्रमवारीत अर्जुन 9 व्या क्रमांकावर आहे. अर्जुन पहिल्यांदाच FIDE रेटिंग लिस्टच्या टॉप 10 मध्ये आला आहे. विश्वनाथन आनंद, पेंटाला हरिकृष्णा आणि गुकेश यांच्यानंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये प्रवेश करणारा तो चौथा भारतीय आहे. सध्या तो जागतिक क्रमवारीत 2756 रेटिंगसह 9व्या क्रमांकावर आहे, तर विश्वनाथन आनंद 11व्या स्थानी घसरला आहे, त्याचे रेटिंग 2751 आहे. याआधी युवा डोंबराज गुकेशनेही अनुभवी आनंदला मागे टाकले होते.
अर्जुनने हे यश नुकत्याच खेळल्या गेलेल्या 5व्या शेन्झेन चेस मास्टर्स आणि बुंदेसलिगा वेस्टमधील उत्कृष्ट कामगिरीचे फळ आहे. जिथे त्याने 8.3 एलो रेटिंग पॉइंट्स मिळवले. सध्या तो ग्रेन्के चेस ओपन 2024 मध्येही आपली ताकद दाखवत आहे. येथे त्याने आतापर्यंत 7 पैकी 6 गुण मिळवले आहेत. मात्र, तो अव्वल तीन खेळाडूंपेक्षा अर्धा गुण मागे आहे.
जागतिक क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर मॅग्नस कार्लसन अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 2830 आहे. त्याच्यानंतर अमेरिकेचा फॅबियानो कारुआना 2803 गुणांसह दुस-या स्थानावर तर हिकारू नाकामुरा 2789 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या टॉप 16 मध्ये चार, टॉप 25 मध्ये पाच, टॉप 41 मध्ये आठ आणि टॉप 81 मध्ये दहा भारतीय आहेत. टॉप टेन खेळाडूंच्या सरासरी रेटिंगच्या बाबतीत भारत सध्या क्रमांक 2 वर आहे. (हेही वाचा: Paris Olympics Lifts Intimacy Ban: पॅरिस ऑलिम्पिकने कामक्रीडेवरील बंदी उठवली, खेळाडूंना दिले 300,000 कंडोम)
दरम्यान, अर्जुनचा जन्म 3 सप्टेंबर 2003 रोजी वारंगल, तेलंगणा येथे झाला. त्याचे वडील न्यूरोसर्जन आहेत आणि आई गृहिणी आहे. त्याने हैदराबाद येथील बीएस बुद्धिबळ अकादमीमध्ये बुद्धिबळाचे धडे घेतले.