Who is Swapnil Kusale: कोण आहे स्वप्नील कुसळे? ज्याने साधला निशाणा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकवले कास्य पदक!

या भारतीय नेमबाजाने 451.4 गुणांसह कांस्यपदक जिंकले. तसेच, स्वप्नील कुसळे हा ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज आहे.

Swapnil Kusale (Photo Credit - X)

Paris Olympics 2024: भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने (Swapnil Kusale) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान पटकावले. या भारतीय नेमबाजाने 451.4 गुणांसह कांस्यपदक जिंकले. तसेच, स्वप्नील कुसळे हा ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज आहे. भारतीय नेमबाज नीलिंग आणि प्रोन सीरीज यानंतर स्वप्नील कुसळे 310.1 गुणांसह पाचव्या स्थानावर होता, मात्र यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. पण तुम्हाला स्वप्नील कुसळेची गोष्ट माहित आहे का? वास्तविक, या भारतीय नेमबाजाची कहाणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी मिळतीजुळती आहे.

कोण आहे स्वप्नील कुसळे?

नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. 6 ऑगस्ट 1994 मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

रेल्वेमध्ये होता कार्यक्रात

सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. स्वप्नील कुसळेचा संघर्ष भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी याच्या आयुष्यासारखाच आहे. 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. स्वप्नील कुसळे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. (हे देखील वाचा: Swapnil Kusale Wins Bronze at Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे च्या कामगिरीवर PM Narendra Modi ते मध्य रेल्वे प्रशासनाकडून कौतुकचा वर्षाव!)

स्वप्नील कुसळे महेंद्रसिंग धोनीला मानतो आपला आदर्श 

वास्तविक, स्वप्नील कुसळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो. स्वप्नील म्हणतो की, त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि दिग्गज क्रिकेटपटूच्या कामगिरीपासून प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते. त्यामुळेच स्वप्नील धोनीसोबत आयुष्य जोडू शकतो.

स्वप्नील कुसळेची कामगिरी

त्याने नेमबाजीत अनेक कामगिरी केली आहे. ज्यामध्ये त्याने कुवेत येथे 2015 आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रो 3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त, त्याने गगन नारंग आणि चैन सिंग सारख्या प्रसिद्ध नेमबाजांना हरवून तुघलकाबाद येथे 59 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिरुअनंतपुरममधील 61 व्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने या यशाची पुनरावृत्ती केली आणि 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक जिंकले.

याशिवाय कैरो येथे 2022 च्या जागतिक स्पर्धेत स्वप्नीलने चौथे स्थान मिळवले आणि भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवला. 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि बाकू येथे 2023 विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकली.