भारतीय सैन्य दलाचे जवान बिश्वर्जित सिंह सैखोम यांनी जिंकली गोवामध्ये आयोजित Ironman 70.3 Triathlon स्पर्धा
सैखोमने 4 तास 42 मिनिटं अशी वेळ नोंदवून विजय मिळवला. निहाल बेग आणि महेश लौरेम्बम यांनी प्रत्येकी दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.
इंडियन आर्मीच्या बिश्वर्जित सिंह सैखोम (Bishworjit Singh Saikhom) याने गोव्यात आयोजित आयर्नमॅन (Ironman) 70.3 ट्रायथलॉन (Trithalon) स्पर्धा जिंकली. सैखोमने 4 तास 42 मिनिटं अशी वेळ नोंदवून विजय मिळवला. निहाल बेग (Nihal Beg) आणि महेश लौरेम्बम यांनी प्रत्येकी दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. भारतात पहिल्यांदा आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉन स्पर्धेचं आयोजन रविवारी करण्यात आले होते. बॉम्बे सेपर्ससह हवालदार म्हणून काम करणाऱ्या पुण्याच्या या 29 वर्षीय रहिवाश्याने 1.9 किलोमीटर जलतरण, 90 कि.मी. सायकलिंग आणि 21 कि.मी. धाव 4 तर 42 मिनिट आणि 44 सेकंदात पूर्ण केले. आयआयटी बॉम्बेचा माजी विद्यार्थी बेगने 4 तास 47 मिनिटे 47 सेकंदात रेस पूर्ण करण्याची कामगिरी करत दुसर्रे स्थान मिळवले.
क्रीडाप्रेमी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवताना पाहणे सर्वांनाच उल्हसित करणारे होते. नॅशनल एरियाचे कमांडिंग अॅडमिरल फिलिपोस जी पनुमुतिल देखील मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत स्पर्धकांचे मनोबल वाढवत होते. गोवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विश्वातील 27 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
हे आहेत आयर्नमॅन स्पर्धेतील पहिले 10 विजेते
बी सैखोम (भारत): 04:42:44
निहाल बेग (भारत): 04:47:47
एम लॉरेम्बाम (भारत): 04:52:04
पाब्लो एराट (स्वित्झर्लंड): 04:56:24
पी रावळू (भारत): 04:57:54
स्कॉट विल्सन (ऑस्ट्रेलिया): 05:15:44
सी व्हीलर (इंग्लंड): 05:18:09
एक कांदिपुप्पा (भारत): 05:19:38
एन कुलकर्णी (भारत): 05:23:29
डी क्रॅसियर (फ्रान्स): 05:26:50