Olympics Sport Climbing Google Doodle: ओलंपिक स्पोर्ट क्लाइम्बिंग गूगल डूडल; गिर्यारोहण करणारा गिर्यारोहक पाहिलात का?

आजही (7 ऑगस्ट) ओलंपिक स्पोर्ट क्लाइम्बिंग गूगल डूडल (Olympics Sport Climbing Google Doodle) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Olympics Sport Climbing Google Doodle | (Photo Credits: Google )

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) क्रीडा स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी होतात. खेळातील निपूणतेसोबतच त्यांच्या विशेष कौशल्याचाही कस लागतो. ज्यामुळे जगभरातील क्रीडाप्रेमींना उत्कंटा वाढवणारी कामगिरी पाहायला मिळते. अशा वेळी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असलेले गूगल तरी कसे मागे राहील. गूगलही आपल्या मुखपृष्टावर डूडल साकारत या स्पर्धेचा आनंद साजरा करते. त्यामुळे आजचे गूगल डूडल काय? (Google Doodle Today) याबाबत अनेकांना उत्सुकता असते. आजही (7 ऑगस्ट) ओलंपिक स्पोर्ट क्लाइम्बिंग गूगल डूडल (Olympics Sport Climbing Google Doodle) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आजच्या गूगल डूडलमध्ये एक ॲनिमेटेड पक्षी गरुडाच्या आकाराच्या टेकडीवर चढताना दाखवण्यात आला आहे, जो खेळातील उत्साह आणि आव्हानाचे प्रतीक आहे. आज होत असलेल्या क्लाइंबिंग स्पोर्ट्स इव्हेंटच्या सेमीफायनल लीडला हायलाइट करण्यासाठी Google ने हे डूडल जारी केले आहे. पुरुषांच्या बोल्डर आणि लीड स्पर्धेत, दक्षिण आफ्रिकेचा जेन्से व्हॅन रेन्सबर्ग, ऑस्ट्रेलियाचा सी हॅरिसन, ग्रेट ब्रिटनचा एच मॅक आर्थर, स्लोव्हेनियाचा एल पोटोकार, चीनचा वायएफ पॅन आणि इतर अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. (हेही वाचा, Artistic Swimming Olympics Google Doodle: पाण्यात पोहणारे पक्षी आणि आर्टिस्टिक स्विमिंग ऑलिम्पिक 'गूगल डूडल')

गिर्यारोहण ऑलिम्पिक खेळ

चपळता आणि आव्हान यांचा संगम म्हणजे गिर्यारोहण. हा एक उत्साहवर्धक ऑलिम्पिक खेळ आहे ज्यामध्ये दोन गिर्यारोहक 15 मीटरच्या भिंतीवर शेजारी-शेजारी शर्यत करतात. हा खेळ प्रथम टोकियो 2020 ऑलिंपिकमध्ये तीन विभागांमध्ये एकत्रीत खेळला जाताना दिसला. ज्यामध्ये बोल्डरिंग, लीड क्लाइंबिंग आणि स्पीड क्लाइंबिंग आदींचा समावेश आहे.

बोल्डरिंग: दोरीशिवाय लहान, तांत्रिक चढाई.

लीड क्लाइंबिंग: गिर्यारोहक चढताना संरक्षण बिंदूंवर दोरी कापतात.

स्पीड क्लाइंबिंग: शक्य तितक्या लवकर 15-मीटर भिंतीच्या शिखरावर जाण्याची शर्यत.  (हेही वाचा, Gymnastics Rings Google Doodle: रिंग जिम्नास्टिकसाठी गुगलकडून खास डूडल)

पॅरिस 2024 साठी बदल

पॅरिस 2024 ऑलिंपिकसाठी, स्पोर्ट क्लाइंबिंग दोन स्वतंत्र पदक स्पर्धांमध्ये विभागले गेले आहे:

आज (7 ऑगष्ट) ऑलिम्पीक वेळापत्रक

ॲथलेटिक्स

गोल्फ

टेबल टेनिस

कुस्ती

वजन उचलणे (वेट लिफ्टींग

दरम्यान, पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेचा आजा बारावा दिवस आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 4 पदके मिळवली आहेत. शिवाय आणखीही काही पदके मिळविण्यासाठी भारताचा प्रयत्न राहणार आहे.