Free Sex Service: फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये फ्रान्स जिंकल्यास मिळणार 'मोफत सेक्स सेवा'; सेक्स वर्कर्सची अनोखी ऑफर

फ्रान्सने 14 डिसेंबर रोजी मोरोक्कोचा 2-0 ने पराभव करून गतविजेते म्हणून यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Prostitute. Representational image. (Photo Credits: Getty Images)

सध्या कतारमध्ये (Qatar) खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup 2022) उत्साह लोकांना वेड लावत आहे. आता आज रविवारी अंतिम फेरीत फ्रान्सचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिनातील लोकांसोबतच जगभरातील चाहते या सामान्याबाबत विशेष उत्सुक आहेत. फ्रान्सच्या सेक्स वर्कर्समध्येही (Sex Workers) या सामान्याबाबत विशेष उत्साह दिसून येत आहे. यामुळेच या सेक्स वर्कर्सनी सर्वानुमते एक अनोखी ऑफर दिली आहे.

फ्रान्सने रविवारी फायनल जिंकल्यास मोफत सेक्स सर्व्हिस देण्यात येईल, अशी ऑफर सेक्स वर्कर्सनी दिली आहे. फ्रान्सने 14 डिसेंबर रोजी मोरोक्कोचा 2-0 ने पराभव करून गतविजेते म्हणून यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता आज जर फ्रान्स जिंकल्यास सलग दोनदा विश्वचषक जिंकून हा संघ इतिहास रचणार आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की, यंदाचा विश्वचषक कोणता देश आपल्या नावावर करणार आहे. परंतु त्या आधी सेक्स वर्कर्सची ही विशेष ऑफर सध्या चर्चेत आहे.

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना आज, रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला $42 दशलक्ष बक्षीस रक्कम दिली जाईल, तर उपविजेत्या संघाला $30 दशलक्ष मिळतील. याआधी 2018 मध्ये फ्रान्सने फिफा विश्वचषक जिंकला होता. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत फ्रान्सचा संघ चार वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. जर्मनीने सर्वाधिक 8 वेळा फिफा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. जर्मनीने चार वेळा फायनल जिंकली आणि चार वेळा पराभव स्वीकारला. (हेही वाचा: अबब! फिफा फुटबॉल विश्वचषक विजेत्या आणि उप-विजेत्या संघाला मिळणार 'इतकी' मोठी रक्कम, घ्या जाणून)

जर्मनीने 1954, 1974, 1990 आणि 2014 फिफा विश्वचषक जिंकले. ब्राझील 7 वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळला आहे. ब्राझील संघ 1958, 1962, 1970, 1994, 2002 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा अर्जेंटिना संघाचा हा सहावा अंतिम सामना आहे. यापूर्वी अर्जेंटिनाने 5 वेळा अंतिम सामना खेळला असून 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर फ्रान्सचा हा चौथा अंतिम सामना आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif