Former WWE Wrestler Sara Lee: डब्ल्यूडब्ल्यू स्टार सारा ली हिच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर; घ्या जाणून
WWE स्टार आणि माजी रेसलर सारा ली (Former WWE Wrestler Sara Lee) हिच्या निधनाबद्दलचे वास्तव आणि खरे कारण पुढे आले आहे. सारा ली हिचा पाठिमागील वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये मृत्यू झाला होता. सारा ली ( Sara Lee) हिच्या अकाली मुत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे आली आहेत. टीएमझेडच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सारा ली हिचा मृत्यू आतमहत्या कल्याने झाला असवा. तिने मृत्यूपूर्वी अल्कोहोल आणि ड्रग्सचे मिश्रण प्राशन केले होते, असा तिचा शवविच्छेदन अहवाल सांगतो, असे या वृत्तात म्हटले आहे.
सारा लीची आई टेरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या कन्येच्या निधनाचे वृत्त दिले होते. तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. टेरी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते की, आम्हाला सांगताना आतीव दु:ख होते आहे. आम्ही अत्यंत जड अंतकरणाने सांगतो आहोत की, आमची सारा वेस्टन येशूबरोबर गेली आहे. तिच्या जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. कृपया आम्हाला दु:खातून सावरु द्या. आपण सर्वांनी तिच्या मुलांसाठी प्रार्थना करावी.
सारा ली हिच्या मृत्यूनंत तिच्या कुटुंबातील आणि तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, मृत्यू झाला त्या दिवशी सारा हिने प्रचंड मद्यपान केले होते. त्यामुळे तिचे अपघाती निधन झाले. मृत्यू दरम्यान ती 30 वर्षांची होती, असेही या व्यक्तीने सांगिले.
TMZ स्पोर्ट्सने म्हटले आहे की, सारा ली हिच्या वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालात तिने अल्होहोल आणि ड्रग्जच्या गोळ्या घेतल्याचे पुढे आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2023 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

